ETV Bharat / state

सातार: कांद्याला दर नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत... - कांदा उत्पादक शेतकरी

देशासह राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण भारतात संचारबंदी आणि लाॅकडाऊन जाहीर केले. यामुळे खासगी वाहतूक बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

onion farmers face problems due to low prices in market in satara
कांद्याला दर नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत...
author img

By

Published : May 28, 2020, 6:01 PM IST

सातारा - सध्या संपुर्ण जगाला कोरोनाने हैराण करुन सोडले आहे. देशासह राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण भारतात संचारबंदी आणि लाॅकडाऊन जाहीर केले. यामुळे खासगी वाहतूक बंद असल्याने शेतीमालाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये शेतकर्‍यांनी उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. जिल्ह्यातील अनेक भागात कांदा काढणीस सुरुवात झाली. परंतु, बाजारात कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे.

कांद्याला दर नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत...

बाजारपेठांवर सध्या सर्वत्र बंधने घालण्यात आल्याने बाजारात कांद्याला ग्राहक मिळत नाही. त्यामुळे कांद्याचे बाजार आणखी कमी होत चालले आहेत. गतवर्षी दहा हजार ते पंधरा हजार प्रती क्विंटल कांद्याची विक्री झाली. परिणामी यावर्षी कांद्याच्या दराची मोठ्या प्रमाणात घसरण होऊन सहाशे ते सातशे प्रती क्विंटल दराने बाजारभाव चालू आहेत. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे उत्पादक खर्चही भरुन निघणे मुश्कील होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कांदा साठवून ठेवण्यास प्राधान्य देत आहेत.

तापमान बदल्यामुळे पोषक वातावरण न मिळाल्यास कांद्याचे मोठे नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी शास्त्रोक्त पध्दतीने साठवण करावी लागते. त्यामुळे शेतकर्‍यांनी ठिकठिकाणी ऐरणी उभारुन कांदा साठवण करण्यास सुरूवात केली. कांदा साठवण केल्याने बाजारभाव वाढल्यानंतर कांदा विक्रिस आणून काही प्रमाणात फायदा मिळणे शक्य असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.