ETV Bharat / state

एकाच रात्रीत चोरट्यांनी मलकापुरातील 3 फ्लॅट फोडले; 80 हजाराचा ऐवज लंपास - robbery incident in Karad

कराडजनीकच्या मलकापूरमध्ये चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे तीन अपार्टमेंटमधील तीन फ्लॅट फोडले. यातील एका फ्लॅटमधील 80 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

one night thieves broke into three flats in Karad Malkapur city
एकाच रात्रीत चोरट्यांनी कराडनजीकच्या मलकापुरातील तीन फ्लॅट फोडले
author img

By

Published : Dec 7, 2019, 2:56 AM IST

सातारा - कराडनजीकच्या मलकापूरमध्ये चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे तीन अपार्टमेंटमधील तीन प्लॅट फोडले. त्यातील एका फ्लॅटमधील तीन तोळ्याचे दागिने आणि 5 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. घरफोड्या झाल्याची माहिती मिळताच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

मलकापूरमधील पंचरत्न अपार्टमेंटमध्ये छाया गणपती गरूड यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या पतीची तब्येत ठीक नसल्याने त्या बुधवारी पुण्याला गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 6 वाजता त्यांना शेजारच्या लोकांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या तातडीने मलकापूरला आल्या. घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील लाकडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाटाच्या ड्रॉव्हरमधील 20 हजार रूपये किमतीची 1 तोळ्याची चैन, 30 हजार रूपये किमतीच्या दीड तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, 25 हजार रूपये किमतीचे कानातील टॉप्स व 5 हजार रूपये, असा 80 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कराड पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले.

कराड आणि मलकापूर या झपाट्याने विस्तारणार्‍या शहरात चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सीसीटीव्हींची संख्या वाढवावी, या अनुषंगाने कराड नगरपालिकेच्या गुरूवारच्या विशेष सभेत मागणी करण्यात आली. शिवाजी हौसिंग सोसायटी, प्रकाश नगर या भागात चोर आल्याची चाहूल लागल्यानंतर परवानाधारक नागरीकांना आपल्या बंदुकीतून फायरिंग करावी लागल्याचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत सांगितले होते. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी रात्री गस्त वाढवण्याची गरज आहे.

Intro:कराडनजीकच्या मलकापूरमध्ये चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे तीन अपार्टमेंटमधील तीन प्लॅट फोडले. त्यातील एका फ्लॅटमधील तीन तोळ्याचे दागिने आणि 5 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. घरफोड्या झाल्याची माहिती मिळताच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.Body:
कराड (सातारा) - कराडनजीकच्या मलकापूरमध्ये चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे तीन अपार्टमेंटमधील तीन प्लॅट फोडले. त्यातील एका फ्लॅटमधील तीन तोळ्याचे दागिने आणि 5 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. घरफोड्या झाल्याची माहिती मिळताच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
   मलकापूरमधील पंचरत्न अपार्टमेंटमध्ये छाया गणपती गरूड यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या पतीची तब्येत ठीक नसल्याने त्या बुधवारी पुण्याला गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 6 वाजता त्यांना शेजारच्या लोकांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या तातडीने मलकापूरला आल्या. घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील लाकडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाटाच्या ड्रॉव्हरमधील 20 हजार रूपये किमतीची 1 तोळ्याची चैन, 30 हजार रूपये किमतीच्या दीड तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, 25 हजार रूपये किमतीचे कानातील टॉप्स व 5 हजार रूपये, असा 80 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कराड पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. 
    कराड आणि मलकापूर या झपाट्याने विस्तारणार्‍या शहरात चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सीसीटीव्हींची संख्या वाढवावी, या अनुषंगाने कराड नगरपालिकेच्या गुरूवारच्या विशेष सभेत मागणी करण्यात आली. शिवाजी हौसिंग सोसायटी, प्रकाश नगर या भागात चोर आल्याची चाहूल लागल्यानंतर परवानाधारक नागरीकांना आपल्या बंदुकीतून फायरिंग करावी लागल्याचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी कराड नगरपालिकेच्या विशेष सभेत सांगितले होते. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रगस्त वाढविण्याची गरज आहे, Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.