ETV Bharat / state

दिवाळीची रोषणाई करताना लागला शॉक; साताऱ्यात एकाचा मृत्यू तर पत्नीसह दोन मुले जखमी - One died due to electric shock

चिमणपूरा पेठेतील कारंडबी नाका परिसरात राहणाऱ्या सुनील तुकाराम पवार (वय ४०) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. सुनील पवार यांना घरासमोरुन गेलेल्या महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनीचा शॉक बसला.

One died due to electric shock in satara
दिवाळीची रोषणाई करताना लागला शॉक; साताऱ्यात एकाचा मृत्यू तर पत्नीसह दोन मुले जखमी
author img

By

Published : Nov 1, 2021, 10:01 AM IST

सातारा - दिवाळीनिमित्त घरावर विद्युत रोषणाई करताना उच्चदाबाच्या वीज वाहिनीचा शॉक लागल्याने चिमणपूरा पेठेतील कारंडबी नाका परिसरात राहणाऱ्या सुनील तुकाराम पवार (वय ४०) यांचा रात्री मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत पवार यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. साताऱ्यात चिमणपूरा पेठेतील कारंडबी नाका येथे सुनील तुकाराम पवार हे पत्नी ज्योती तसेच मुले श्रवण आणि ओम यांच्यासह वास्तव्याला होते. सायंकाळी ते दिवाळीसाठी आकाशकंदील व लाईटच्या माळा खाली सोडत होते. हे काम करत असतानाच सुनील पवार यांना घरासमोरुन गेलेल्या महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनीचा शॉक बसला.

पत्नी व मुले गेली सोडवायला -

सुनील पवार यांना शॉक बसल्याचे लक्षात आल्यानंतर ज्योती त्यांना सोडविण्यासाठी त्याठिकाणी गेल्या. मात्र, त्यांना देखील जोराचा शॉक बसला. आईवडील थरथरत असल्याचे पाहून तिकडे श्रवण आणि ओम यांनी धाव घेतली. यावेळी त्या दोघांनाही शॉक बसला. उच्चदाब वाहिनीचा शॉक बसल्याने सुनील पवार, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सोडवणूक केली.

तालुका पोलिसांकडे तपास -

दरम्यान, सुनील पवार यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्य‍ांनी सुनील पवार यांना मृत घोषित केले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. हवालदार शिखरे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्रात फडणवीसांच्या इशाऱ्यावरच ड्रग्जचा धंदा; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.