ETV Bharat / state

कराड-चिपळूण मार्गावर एसटी-मोटरसायकल अपघात, एक ठार - कराड-चिपळूण

एसटी आणि मोटरसायकलच्या अपघातात मोटरसायकलवरील एक ठार आणि एक जण जखमी झाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी कराड-चिपळूण मार्गावर वसंतगड (ता. कराड) येथे घडली.

अपघातग्रस्त एसटी बस
अपघातग्रस्त एसटी बस
author img

By

Published : Dec 14, 2019, 11:51 PM IST

सातारा - एसटी आणि मोटरसायकलच्या अपघातात मोटरसायकलवरील एक ठार आणि एक जण जखमी झाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी कराड-चिपळूण मार्गावर वसंतगड (ता. कराड) येथे घडली. दरम्यान, अपघातानंतर जमावाने एसटी रस्त्यातच अडवून ठेवल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

कराडहून तांबवेकडे निघालेली एसटी (क्र. एम. एच. 14 बी. टी. 0346) ही वसंतगड हद्दीत पोहचल्यानंतर एसटी आणि मोटरसायकलचा अपघात झाला. अपघातानंतर मोटरसायकलवरील अभिजीत नंदकुमार कुकडे (वय 25) आणि जगदीश शशिकांत जाधव (वय 45, दोघे रा. मल्हारपेठ, ता. पाटण) हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. जगदीश जाधव यांना कृष्णा रुग्णालयात आणि अभिजीत कुकडे यास सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अभिजीत कुकडे या युवकाचा मृत्यू झाला, तर जगदीश जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा - दोन मुलांसह महिलेची कोयना नदीत आत्महत्या, एका बालकाचा मृतदेह सापडला

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. जमावाने एसटी बस रस्त्यातच अडवून ठेवली. त्यामुळे कराड-पाटण मार्गावर सूपने ते वसंतगड दरम्यान वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. याबाबतची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर हे पोलीस कर्मचार्‍यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करून अपघातातील एसटी रस्त्यातून एका बाजूला घ्यायला लावली आणि वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा - कराडमध्ये बर्निंग बाईकचा थरार, अ‍ॅक्टिव्हा जळून खाक

Intro:एसटी आणि मोटरसायकलच्या अपघातात मोटरसाकलवरील एक ठार आणि एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी कराड-चिपळूण मार्गावर वसंतगड (ता. कराड) येथे घडली. दरम्यान, अपघातानंतर जमावाने एसटी रस्त्यातच अडवून ठेवल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. Body:
सातारा (कराड) - एसटी आणि मोटरसायकलच्या अपघातात मोटरसाकलवरील एक ठार आणि एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी कराड-चिपळूण मार्गावर वसंतगड (ता. कराड) येथे घडली. दरम्यान, अपघातानंतर जमावाने एसटी रस्त्यातच अडवून ठेवल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. 
  कराडहून तांबवेकडे निघालेली एस. टी. (क्र. एम. एच. 14 बी. टी. 346) ही वसंतगड हद्दीत पोहचल्यानंतर एसटी आणि मोटरसायकलचा अपघात झाला. अपघातानंतर मोटरसायकलवरील अभिजीत नंदकुमार कुकडे (वय 25) आणि जगदीश शशिकांत जाधव (वय 45, दोघेही रा. मल्हारपेठ, ता. पाटण) हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. जगदीश जाधव यांना कृष्णा रूग्णालयात आणि अभिजीत कुकडे यास सह्याद्रि हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अभिजीत कुकडे या युवकाचा मृत्यू झाला, तर जगदीश जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. 
  अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. जमावाने एसटी बस रस्त्यातच अडवून ठेवली. त्यामुळे कराड-पाटण मार्गावर सुपने ते वसंतगड दरम्यान वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली. याबाबतची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर हे पोलिस कर्मचार्‍यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करून अपघातातील एसटी रस्त्यातून एका बाजूला घ्यायला लावून वाहतूक सुरळीत केली. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.