सातारा - एकनाथ शिंदे यांच्यासह कुटुंबीयांना मावोवाद्यांकडून आलेल्या धमकी प्रकरणी माजी गृहमंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी गौप्यस्फोट केला आहे, शिंदे कुटूंबाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीच्या दिवशी सकाळी वर्षा निवासस्थानातून उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. तुम्हाला अशी सुरक्षा वाढविता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते, असा गौप्यस्फोट माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) सुरक्षेबाबत हलगर्जीपण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यात आता शंभूराजे देसाईंना एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द शंभूराज देसाईंनी देखील बैठकी दिवशी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याची माहिती मीडियाला दिली आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका
शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण - एकनाथ शिंदेसह त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीच्या अनुषंगाने विधान परिषदेत चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मी मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक आयोजित केली होती. बैठकी दिवशी सकाळी मला वर्षा निवासस्थानातून उद्धव ठाकरेंचा फोन आला. तुम्ही बैठक घेतली आहे का, अशी त्यांनी विचारणा केल्यानंतर मी योग्य ती माहिती दिली. मात्र, तुम्हाला असे काही करता येणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी मला सांगितले होते. कशासाठी सांगितले, त्याचे कारण काय होते, याचा मला आज अखेर उलगडा झालेला नाही, असे शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Krupal Tumane : 'खासदारांना विनायक राऊतांचा प्रचंड त्रास, लोकसभेत बाजू मांडू देत नसत'; कृपाल तुमानेंचा आरोप