सातारा- कर्तव्य बजावत असताना महामार्ग पोलीस केंद्र भुईंज (जोशी विहीर) येथील सचिन फरांदे यांचा हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. कमी वयात पोलीस दलातील एका उमद्या कर्मचार्याचा मृत्यू झाल्याने सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन सर्जेराव फरांदे (वय 38) रा. ओझर्डे, ता. वाई हे महामार्ग पोलीस केंद्र भुईंज (जोशी विहीर) येथे कर्तव्यास होते. शनिवारी नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
अतिशय कमी वयामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जिल्हा पोलीस दल आणि त्यांच्या मित्र परिवारामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तसेच दोन मुले आहेत. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात आकस्मिक निधनाची नोंद करण्यात आली आहे.