ETV Bharat / state

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, नितीन खाडेंची आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी वर्णी

जिल्ह्याचे सुपुत्र नितीन खाडे यांची केंद्र सरकारने आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते आसाम राज्याच्या सात प्रशासकीय विभागाचा कार्यभार एकाचवेळी सांभाळत होते.

Nitin Khade elected the Chief Electoral Officer of Assam
नितीन खाडेंची आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी वर्णी
author img

By

Published : Jul 5, 2020, 5:22 PM IST

सातारा - जिल्ह्याचे सुपुत्र नितीन खाडे यांची केंद्र सरकारने आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते आसाम राज्याच्या सात प्रशासकीय विभागाचा कार्यभार एकाचवेळी सांभाळत होते. ते मुळचे सातारा जिल्ह्यातील माण येथील आहेत.

यापूर्वी त्यांनी आसाम राज्यात विविध विभागांचे सचिव म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यामध्ये कामगार कल्याण विभाग, जलसंपदा विभाग, कौशल्य विकास, गृह आणि नियोजन विभाग इत्यादी विभागांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अर्थ विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त बराक व्हॅली, विकास आयुक्त हिल एरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेट ईनोव्हेशन अँड ट्रान्सफाँरमेशन आयोगाच्या (SITA) अशा अतिरिक्त जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.