ETV Bharat / state

दिवंगत विलासकाका उंडाळकरांच्या स्मरणार्थ कोविड रुग्णांना मोफत जेवण

author img

By

Published : May 5, 2021, 4:33 PM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या स्मरणार्थ मलकापूरच्या नगरसेविका कमल कुराडे, त्यांचे पुत्र जयंत कुराडे आणि प्रशांत पाचुपते यांच्यातर्फे कोविड रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यात विनामूल्य जेवण देण्यात येत आहे.

कोविड रुग्णांना मोफत जेवण
कोविड रुग्णांना मोफत जेवण

कराड (सातारा) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या स्मरणार्थ मलकापूरच्या नगरसेविका कमल कुराडे, त्यांचे पुत्र जयंत कुराडे आणि प्रशांत पाचुपते यांच्यातर्फे कोविड रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात विनामूल्य जेवण देण्यात येत आहे.

दिवंगत विलासकाका उंडाळकरांच्या स्मरणार्थ कोविड रुग्णांना मोफत जेवण

विलास पाटील-उंडाळकर यांच्या स्मरणार्थ आणि सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या समाजकार्याच्या प्रेरणेतून कोविड रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या रूग्ण आणि नातेवाईकांना रात्रीचे जेवण हवे आहे, त्यांनी संपर्क केल्यास त्यांना विनामूल्य जेवण देण्यात येत आहे. मलकापूरच्या नगरसेविका कमल कुराडे यांचे पुत्र जयंत कुराडे आणि प्रशांत पाचुपते यांचे ढेबेवाडी फाट्यावर हॉटेल आहे. शासनाचे नियम आणि वेळेचे पालन करून सायंकाळी 7 ते 8 या वेळेत विनामूल्य जेवण दवाखान्यात दिले जात आहे. ज्यांना जेवण हवे असेल, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेविका कमल कुराडे, जयंत कुर्‍हाडे आणि प्रशांत पाचुपते यांनी सोशल मीडियावरून केले आहे.

'सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राबवतोय उपक्रम'

लोकनेते दिवंगत विलासकाका उंडाळकरांनी पन्नास वर्षे समाजकारण केले. कार्यकर्त्यांवर सामाजिक कार्याचे संस्कार केले. त्याच मार्गावरून वाटचाल करत आम्ही विलासकाकांच्या स्मरणार्थ कोविड रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी दवाखान्यात विनामूल्य जेवण देत आहोत. उपचार घेणार्‍या कोविड रूग्णांना घरून जेवण आणून देणे नातेवाईकांना शक्य होत नाही. म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सामाजिक कार्याची देखील प्रेरणा आम्हाला मिळाली आहे, असे जयंत कुराडे, प्रशांत पाचुपते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.