सातारा - जिल्ह्यात गुरूवारी 30 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 452 वर पोहचला आहे. तर उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 303 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
मुंबईहून प्रवास करुन आलेल्या बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रोज 30 ते 50 बाधितांची भर पडत आहे. गुरुवारी संध्याकाळी 4 तर रात्री उशिरा 26 जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. जावळी तालुक्यातील केळघर (तेटली) येथील मुंबई वरून आलेल्या चार वर्षे आजारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू 26 मे रोजी झाला होता, मृत्यू पश्चात त्याचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
आजपासुन क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात Truenat Machine द्वारे कोविड-19 ची चाचणी करण्याची तयारी करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. आत्तापर्यंत जिल्ह्यात 452 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 134 रुग्ण बरे झाले आहेत. तर 302 रुग्णांवर उपचार सुरु असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय 30 रुग्णाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
* पाटण : सळवे 1, सदूवरपेवाडी 1, करपेवाडी 1, गलमेवाडी 1, घनबी 1, भरेवाडी -1, तामिणी 1.
*कराड : म्हासोली 8, वानरवाडी 3, विंग 1.
*फलटण : सस्तेवाडी ।
*वाई : जांभळी - 6.
*जावळी : आपटी 1, केळघर - 1.
* सातारा : परळी 2
214 जणांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय 13, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 64, ग्रामीण रुग्णालय वाई 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 61, उपजिल्हा रुग्णालय फलटण 24, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव 6 व शिरवळ येथे कोविड केअर सेंटरमधील 30 असे एकूण 214 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.