सातारा - सातारा जिल्ह्यात शुक्रवारी 4 हजार 123 नागरिकांच्या तपासणीअंती 242 जणांना काेविडची लागण (New Corona Cases in Satara) झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. पाॅझिटिव्हिटीचा दर (Positivity Rate) वाढून 5.87 वर पोहचला आहे.
सातारा जिल्ह्यात कोविडने डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 242 संशयित बाधित निष्पन्न झाले. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट 5.87 इतका आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने याबाबतची आकडेवारी दिली आहे.
614 रुग्णांवर उपचार
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 4 हजार 123 नमूने घेण्यात आले. पैकी 242 जणांचे अहवाल बाधित आले. तर एका बाधिताचा मृत्यु झाला. एकूण 614 रुग्णांवर जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर 187 रुग्णांना उपचार पुर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात आजअखेर
नमुने -23,95,320
बाधित - 2,53,355
मृत्यू - 6,500
मुक्त - 2,45, 299