ETV Bharat / state

Maharashtra political crisis : बंडानंतर शरद पवारांनी गेम पालटला... अजित पवारांच्या गटामधून आमदार मकरंद पाटील पुन्हा वापस - आमदार मकरंद पाटील आणि अतुल बेनके

मुंबईतील अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले साताऱ्यातील आमदार मकरंद पाटील आणि अतुल बेनके यांना दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांच्या गाडीत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे शरद पवारांनी रातोरात खेळ बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे

Maharashtra political crisis
बंडानंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये
author img

By

Published : Jul 4, 2023, 10:33 AM IST

सातारा : शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या सातार्‍यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी अजित पवारांच्या शपथविधीला हजेरी लावल्याने पवारांच्या गोटात खळबळ माजली होती. परंतु, दुसर्‍या दिवशी आमदार मकरंद पाटील हे शरद पवार कराड दौर्‍यात त्यांच्या गाडीत दिसले. यामुळे शरद पवारांनी रात्रीच गेम फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. पण दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या कराड दौऱ्यात आमदार मकरंद पाटील त्यांच्या गाडीत दिसले. त्यामुळे शरद पवारांनी रात्रीच खेळ बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. साताऱ्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

शरद पवारांचे निकटवर्तीय : सातार्‍यातील वाई विधानसभा मतदार संघातील शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून आमदार मकरंद पाटील यांची ओळख आहे. माजी खासदार दिवंगत लक्ष्मण पाटील हे शरद पवारांचे मित्र म्हणून ओळखले जात. आमदार मकरंद पाटील हे त्यांचे सुपूत्र आहेत. लक्ष्मणराव पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि खासदार म्हणून काम केले होते. त्यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांना देखील शरद पवारांनी ताकद दिली. त्यामुळे गेली तीन टर्म ते आमदार आहेत.

मकरंद पाटील यांचा यू-टर्न : अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार यांनी गुरू पौर्णिमेचे निमित्त साधून आपले राजकीय गुरू दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीचे दर्शन घेतले. त्यासाठी ते सोमवारी कराड दौर्‍यावर होते. अजित पवारांच्या शपथविधीला एकमेव सातार्‍यातील आमदार मकरंद पाटील यांची उपस्थिती होती. मात्र, दुसर्‍याच दिवशी ते पवारांच्या गाडीत बसून कराडला आल्याचे पाहायला मिळाले.

रात्रीत गेम फिरविला ? अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील हे एकमेव उपस्थित होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी ते पवार यांच्या गाडीतून कराडला येताना दिसले. अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांची गाडी कराडमध्ये आल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवारांनी रात्री खेळ बदलल्याचीही चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Politics Crisis Update : अनेक पक्षांना एनडीएमध्ये येण्याची इच्छा, राष्ट्रवादीने सुरुवातीला घेतला पुढाकार-अनुराग ठाकूर
  2. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील बंडखोरीवर लालू प्रसाद यादव यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
  3. Maharashtra Political Crisis : सोनिया दुहन दिल्ली पक्ष कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्त, शरद पवारांचा अजित पवारांना आणखी एक धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.