ETV Bharat / state

'मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही', उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया - खासदार उदयनराजे भोसले भाजप प्रवेश

आज खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची शासकिय विश्रामगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी बंद दाराआड चर्चा केली.

छत्रपती निर्णय घेतात त्याप्रमाणे मावळा वाटचाल करतो - खासदार अमोल कोल्हे
author img

By

Published : Sep 2, 2019, 9:20 PM IST

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. राज्यातील अनेक नेतेदेखील याकडे उत्सुकतेने पाहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे भोसले यांची शासकिय विश्रामगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी, तुमच्याकडून उदयनराजेंचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, या प्रश्‍नावर कोल्हे म्हणाले, "मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही. छत्रपती निर्णय घेतात त्याप्रमाणे मावळा वाटचाल करतो."

छत्रपती निर्णय घेतात त्याप्रमाणे मावळा वाटचाल करतो - खासदार अमोल कोल्हे

पत्रकारांसोबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मी साताऱ्यात आल्यावर नेहमी उदयनराजेंची भेट घेतो. त्याप्रमाणेच आजची ही भेट होती. ते माझे मार्गदर्शक आहेत आणि मी त्यांचा चाहता आहे. मी छत्रपती संभाजी आणि राजमाता जिजाऊ या मालिकेविषयी त्यांच्याशी चर्चा केली. महाराजांनी भाजपमध्ये जावे की नाही, हा प्रश्‍न विचारला असाता, उदयनराजे मिश्‍किलपणे म्हणाले, महाराजांनी पृथ्वीवर राहावे असेच कोल्हे यांना वाटते. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, "महाराजांवर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम आहे. प्रत्येकाला वाटते महाराज आपल्यासोबत राहावे. पण जी व्यक्तीमत्वे स्वयंभू असतात ती स्वत:चा निर्णय स्वत: घेऊ शकतात. त्यामुळे महाराजांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत."

Intro:छत्रपती निर्णय घेतात त्याप्रमाणे मावळा वाटचाल करतो- खासदार अमोल कोल्हे

सातारा खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशा यावरती संपुर्ण देशभरात मोठी चारच5 रंगली आहे तर राज्यातील अनेक नेते देखील या प्रवेशासाठी वाट पाहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची शासकिय विश्रामगृहात भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी कमराबंद चर्चा देखील यावेळी केली. यावेळी पत्रकारांन सोबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मी साताऱ्यात आल्यावर नेहमी उदयनराजेंची भेट घेतो. त्याप्रमाणेच आजचीही भेट होती. ते माझे मार्गदर्शक आहेत, मी त्यांचा चाहता आहे. छत्रपती संभाजी आणि राजमाता जिजाऊ या मालिकेविषयी त्यांच्याशी चर्चा केली. 

Body:तुमच्याकडून उदयनराजेंचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, या प्रश्‍नावर कोल्हे म्हणाले, मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही. छत्रपती निर्णय घेतात त्याप्रमाणे मावळा वाटचाल करतो.

छत्रपतींनी मावळ्याचे मन वळवलंय का अमोल कोल्हे मोठ्याने हसले आणि यामध्ये उदयनराजे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज ही मालिका सुरू होण्याअगोदरपासून ते माझे मित्र आहेत. सारखे राजकारण राजकारण किती योग्य आहे. राजकारणाचे गजकरण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. 

महाराजांनी भाजपमध्ये जावे की नाही या अमोल कोल्हेंना विचारलेल्या प्रश्‍नावर खासदार छत्रपती उदयनराजेंनी मध्येच म्हणाले महाराजांनी पृथ्वीवर राहावे, असे वाटते असे मिश्‍किलपणे म्हणताच एकच हशा पिकला. 

त्यावर कोल्हे म्हणाले, महाराजांवर संपूर्ण महाराष्टाचे प्रेम आहे. प्रत्येकाला वाटते महाराज आपल्यासोबत राहावे. पण जी व्यक्तीमत्वे स्वयंभू असतात ती स्वत:चा निर्णय स्वत: घेऊ शकतात. त्यामुळे महाराजांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत, असे संगितले  Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.