ETV Bharat / state

नाट्यगृह 50 टक्के भाडे सवलतीत देण्याची साताऱ्यातील रंगकर्मींची मागणी

author img

By

Published : Nov 5, 2020, 10:17 PM IST

आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त सातारा शहरातील रंगकर्मींनी एकत्र येऊन शाहू कलामंदिर या पालिकेच्या नाट्यगृहातील सेवकांचा गौरव करत अनोख्या पद्धतीने रंगभूमी दिन साजरा केला. रंगकर्मी व माजी नगरसेवक बाळासाहेब राक्षे, अभिनेता-दिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे, अजित करडे, चित्रा भिसे, हेमंत खळतकर, राजेश नारकर आदी रंगकर्मी या वेळी उपस्थित होते.

सातारा
सातारा

सातारा - शहरातील रंगकर्मींनी आज नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांचा गौरव करून अनोख्या पद्धतीने मराठी रंगभूमी दिन साजरा केला. शासनाने 'पुन्हा खुले' अंतर्गत चित्रपटगृहे व नाट्यगृह यांना 50 टक्के प्रेक्षक क्षमतेच्या अटीवर दिलेल्या परवानगीचे स्वागत करत नाट्य प्रयोगासाठी नाट्यगृह 50 टक्के भाडे सवलतीत द्यावे, अशी मागणी या निमित्ताने रंगकर्मींनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

नाट्यगृह 50 टक्के भाडे सवलतीत देण्याची साताऱ्यातील रंगकर्मींची मागणी

आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त सातारा शहरातील रंगकर्मींनी एकत्र येऊन शाहू कलामंदिर या पालिकेच्या नाट्यगृहातील सेवकांचा गौरव करत अनोख्या पद्धतीने रंगभूमी दिन साजरा केला. रंगकर्मी व माजी नगरसेवक बाळासाहेब राक्षे, अभिनेता-दिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे, अजित करडे, चित्रा भिसे, हेमंत खळतकर, राजेश नारकर आदी रंगकर्मी या वेळी उपस्थित होते.

नटराजाची पूजा करून रंगदेवतेला अभिवादन

सातारा पालिकेच्या या नाट्यगृहात 29 फेब्रुवारी रोजी 'तू म्हणशील तसं' हा नाट्यप्रयोग सादर झाला. त्यानंतर मार्चमध्ये लाॅकडाऊन सुरू झाल्याने नाट्यगृह बंद झाले. गेले आठ महिने हे नाट्यगृह नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने उघडलं गेलं नाही. आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त प्रथमच नाट्यगृहाच्या रंगमंचावर कलाकारांनी नटराजाची पूजा करून रंगदेवतेला अभिवादन केले.

हेही वाचा - 'नाट्यगृह भाड्याबाबत सकारात्मक विचार करणार'

याप्रसंगी बोलताना बाळासाहेब म्हणाले, " तब्बल आठ महिन्यानंतर शाहू कला मंदिर हे नाट्यगृह खुले होत आहे. शासनाच्या निर्णयाचे आम्हीं सर्व स्वागत करतो. 50 टक्के प्रेक्षक क्षमतेवर हे नाट्यगृह चालवण्यास परवानगी असल्याने आयोजकांना आर्थिक दृष्ट्या तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शासनाने नाट्यगृह सुरु करण्याचा एक चांगला निर्णय घेत सकारात्मक पाऊल उचलले आहे. नगरपालिका प्रशासनाने या नाट्यगृहातील नाट्य प्रयोगांना 50 टक्के सवलतीमध्ये नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे."

धैर्यशिल उत्तेकर, कुलदीप मोहिते, रविना गोगावले, अभिषेक परदेशी, अमोल जोशी, आदी रंगकर्मी यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.