ETV Bharat / state

Udayanraje Bhosale : नागालँडमध्ये जे ठरले ते प्रत्येक ठिकाणी ठरेल, वेट अँड वॉच; उदयनराजेंच्या वक्तव्याने खळबळ - Udayanaraje Bhosle Statement

नागालॅंडमध्ये जे ठरले ते उद्या प्रत्येक ठिकाणी ठरेल. वेट अँड वॉच, असे वक्तव्य करत खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारबाबत उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Udayanaraje Bhosle Statement
उदयनराजे भोसले
author img

By

Published : Mar 10, 2023, 10:56 PM IST

खासदार उदयनराजे भोसले माध्यमांसोबत संवाद साधताना

सातारा : ईशान्येतील नागालँड राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर तिथे सर्वपक्षीय सरकार सत्तेत आले आहे. देशभरात भाजपविरोधी भूमिका घेणारा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षही तिथल्या सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारबाबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे आणि सूचक वक्तव्य केलं आहे. 'नागालॅंडमध्ये जे ठरले ते उद्या प्रत्येक ठिकाणी ठरेल' म्हणून वेट अँड वॉच, असे सांगत उदयनराजेंनी राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

तिथे ठरले तसे इथेही ठरेल : रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या उदयनराजे भोसले यांना नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली असल्याचा प्रश्न विचारला असता उदयनराजे म्हणाले, मी त्या बैठकीला नव्हतो. त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नाही. तिथे जे ठरले तसे उद्या इथेही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल. त्यामुळे मला माहिती नाही. पण, वेट अँड वॉच, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

पेटिंगच्या वादात शिवेंद्रराजेंची उडी : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेटींगवरून निर्माण झालेल्या या वादात त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगचा वाद हा जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादापेक्षाही गहण असल्याची उपरोधिक टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे. खासदारांचे पेंटिंग कुठे काढायचे, याबाबत राज्यसभा निर्णय देईल, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यावर चित्र काढा : इमारतीच्या भिंतीवर उदयनराजेंचे चित्र काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावर काढा, असे म्हणत शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंना डिवचले. चित्रावरून सुरू असलेला प्रकार हा बालिशपणाचा कळस असल्याची खिल्ली उडवत यातून काय साध्य होणार आहे, असा सवालही केला आहे.

नारळ फोड्यांची गॅंग सक्रिय : सातारा पालिका हद्दवाढ भागातील लोकांच्या सुविधांसाठी आम्ही राज्य सरकारकडून निधी मंजूर करुन आणलेला आहे. पण, मी अधिवेशनात असल्याचे पाहून नारळ फोड्यांची गॅंग साताऱ्यात सक्रिय झाली असल्याची अशी टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर केली.

हेही वाचा : Rohit Pawar On Nagaland Result : नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपीचे न पटल्यास नवीन समीकरण दिसू शकेल - रोहित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.