ETV Bharat / state

MP Supriya Sule: शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार.. आमदारांकडून मध्यावधीची तयारी.. सुप्रिया सुळेंनी संकेत

MP Supriya Sule: सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही, तसेच सगळेच आमदार तयारीला लागले असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे सूचक संकेत Signs of midterm election कराडमधील पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

MP Supriya Sule
MP Supriya Sule
author img

By

Published : Oct 1, 2022, 4:38 PM IST

सातारा: न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयाचा काय निर्णय येतो ते बघुया. परंतु, हे सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. तसेच सगळेच आमदार तयारीला लागले असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे सूचक संकेत Signs of midterm election कराडमधील पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे.

चुकीच्या पध्दतीने सरकार सत्तेवर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयाचा काय निर्णय येतोय ते पाहू. परंतु, मुळातच हे सरकार चुकीच्या पध्दतीने सत्तेवर आले आहे. खोक्यांचा विषय गल्लीबोळात पोहोचला आहे. काही नेते तुम्हाला पाहिजेत का खोके, असे उघडपणे म्हणतात. यावरून राजकारण कोणत्या थराला गेले आहे. हे लक्षात येते. आघाडी सरकारच्या काळातील मंजुर कामे या सरकारने बंद पाडली. निधी अडवला आहे. एका एका मंत्र्यांकडे तीन चार जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ते पालकमंत्री कसे काम करणार ? एकंदर सध्या सरकारमध्ये जे सुरू आहे. ते राज्याच्या हितासाठी धोक्याचे आहे. हे सरकार किती दिवस टिकेल, हे सांगता येत नाही. सगळे आमदार तयारीला लागले असल्याचे पहायला मिळत आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे.

नाती फक्त रक्ताचीच नसतात आमचं नातं आता बहीण- भावाचं राहिलेलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंधं आधी होते. मात्र, नात्यातून राजकारणात वैर निर्माण झाले. त्यामुळे आपल्या वक्तव्याने, वागण्यामुळे काय परिणाम होतात. याचे ज्याचे त्याने आत्मपरीक्षण करावे, असे वक्तव्य आमदार धनंजय मुंडे MLA Dhananjay Munde यांनी केले होते. त्यावर रक्ताचे नाते कधी संपत नसते. माझा कुणीही वैरी नाही, असे उत्तर पंकजा मुंडेंनी दिले होते. या बहिण भावांच्या वक्तव्याच्या संदर्भाने सुप्रिया सुळेंनी आपले मत व्यक्त करताना सगळी नाती फक्त रक्ताची नसतात. परंतु, ती जिव्हाळ्याची, प्रेमाची आणि विश्वासाची असतात, असे म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.