सातारा - फलटण तालुक्यातील तरडगाव येथील महिला शनिवारी कोरोनामुक्त झाली होती. मात्र, काही वेळातच त्यांच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे सातारकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
महिला पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी होऊन आली होती. त्यांचे 14 आणि 15 व्या दिवसाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला होता.
कोरोनामुक्त महिलेला रुग्णालयातून निरोप दिल्यानंतर काही वेळातच तिच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 वर पोहोचली असून या फलटण तालुक्यातील महिलेसह 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त महिलेला 14 दिवस गृह विलगीकरणात राहण्यास जिल्हा रुग्णालयाने सांगितले आहे.क्टर्स, फलटणसह जिल्हावासीयांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.