सातारा - जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 2 हजार 256 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांमध्ये वाढ होऊन ती 1 लाखाच्या पुढे गेली आहे. तर, गेल्या 24 तासांत 42 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
उच्चांकी रुग्णवाढीने चिंता वाढली -
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून गेल्या वर्षभरातील हा उच्चांक आहे. या रूग्णवाढीने जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून रूग्णवाढीने धक्कादायक वाढ झाली आहे. 24 एप्रिल रोजी रूग्णवाढीने आत्तापर्यंतचे अहवाल मोडत 2001 पर्यंत आकडा गाठला होता. त्यानंतर 1933 ते 1437 पर्यंत रूग्णवाढ झाली होती. मात्र गुरूवारी रुग्णवाढीने उच्चांकी आकडा गाठला असून 2 हजार 256 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची वाढ 1 लाखाच्या पुढे गेली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 788 बाधितांची नोंद -
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर गुरूवारपर्यंत बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे -
जावली 69 (4696), कराड 280 (15502), खंडाळा 135 (6171), खटाव 147 (8597), कोरेगांव 205 (8429), माण 270 (5951), महाबळेश्वर 46 (3304), पाटण 111 (4105), फलटण 319 (12670), सातारा 477 (23151), वाई 169 (7668 ) व इतर 28 (544) असे आज अखेर एकूण 1 लाख 788 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
खटाव तालुक्यात 11 मृत्यू -
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्या 42 जणांमध्ये जावली व खंडाळा 1, कराड 9, खटाव 11, कोरेगांव 2, माण 2, महाबळेश्वर 1 , पाटण व फलटण 2, सातारा 8, वाई 3 यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 464 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.