ETV Bharat / state

शस्त्रांचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीवर मोक्का; तिघांचा समावेश - सातारा लेटेस्ट मोक्का कारवाई

दुचाकीस्वारांना शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या तिघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या तिघांनी सातारा आणि पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे केले आहेत.

Satara robbers Mocca news
सातारा लुटारू टोळी मोक्का कारवाई
author img

By

Published : Apr 5, 2021, 9:26 AM IST

सातारा - पुणे व सातारा जिल्ह्यात प्रवास करणार्‍या दुचाकीस्वार महिला अथवा जोडप्यांचा पाठलाग करून लुटणार्‍या टोळीतील तिघांवर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. टोळीप्रमुख महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोतीचौक, फलटण), विकास उर्फ लाल्या उर्फ कानिफनाथ अनिल जाधव (रा. बावधन, ता. वाई), हिमालय सतिश धायगुडे (रा. खेड बु. ता. खंडाळा) अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या तिघांची नावे आहेत. टोळी प्रमुख महेश शिरतोडे याच्यावर 24 गुन्हे दाखल आहेत.

४ लाखांचा मुद्देमाल जप्त -

सोळशी (ता. कोरेगाव)च्या हद्दीत २५ फेब्रुवारी २०२१ला सकाळी साडेअकराच्या सुमारास एक जोडपे डोंगरातील रस्त्याने केदारेश्‍वर मंदिराकडे निघाले होते. त्यावेळी तिघांनी त्यांना मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा २ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. पोलीस तपासामध्ये हा गुन्हा महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे, विकास उर्फ लाल्या उर्फ कानिफनाथ जाधव, हिमालय धायगुडे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यात चोरीस गेलेला ऐवज, रोख रक्कम व आरोपींनी वापरलेली वाहने व मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली वाहने असा एकूण ४ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पुणे जिल्ह्यातही गुन्हे -

या आरोपींनी संघटितपणे फलटण ग्रामीण, फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्‍वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच पुणे जिल्ह्यात बारामती तालुका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले. महामार्गावर व इतर जोड रस्त्यांवरून प्रवास करणार्‍या दुकाचीस्वार व महिला प्रवासी, जोडपे यांना मारहाण करून लुटण्याचे काम ही टोळी करत होती. यामुळे टोळीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मोक्का लावण्यास मंजुरी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.