ETV Bharat / state

Shivendraraje Bhosale : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं फेसबुक पेज हॅक; सायबर सेलकडे तक्रार दाखल - BJP MLA Facebook account hacked

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांचे फेसबुक अकाउंट हॅक (Facebook account hacked) झाले आहे. फेसबुक पेजवर कोणतीही पोस्ट पडल्यास त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाने केले आहे.

Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 3:23 PM IST

सातारा : साताऱ्या जिल्ह्यातील जावळीचे भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक करण्यात आले (Facebook account hacked) आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आमदार शिवेंद्रराजेंच्या जनसंपर्क कार्यालयाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित हॅकरवर (Shivendraraje Bhosale Facebook Hacked) कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनी केली आहे.

चार दिवसांपासून पेज हॅक : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे फॅन फॉलोईंग मोठं आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील पेजवर दैनंदीन कार्यक्रम, विकास निधी, जनता दरबार यासह मतदार संघातील विविध कार्यक्रमांची माहिती प्रसिध्द केली जाते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून ऍडमिनचा अ‍ॅक्सेस काढून घेतल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यानंतर पेजवर सर्च केल्यानंतर सदरचं पेज हॅक केल्याचं स्पष्ट झालं आहे.

सायबर सेलकडे तक्रार दाखल : भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली. अज्ञात हॅकरविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेत पोलीस ठाणे गाठलं. याबबत जनसंपर्क कार्यालयानं सातारा सायबर सेलकडं तक्रार दाखल केलीय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेसबुक पेज हॅक करून दुरूपयोग केला जाऊ शकतो, अशी शंका समर्थकांनी उपस्थित करून तातडीने हॅकरचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

फेसबुक पोस्टला प्रतिसाद देऊ नका : फेसबुक पेज हॅक झालं असल्याने कोणतीही अनाधिकृत पोस्ट पडल्यास त्याला हॅकर जबाबदार असेल, असा इशारा आमदार शिवेंद्रराजेंच्या जनसंपर्क कार्यालयानं दिला आहे. तसेच कोणतीही पोस्ट पडल्यास कार्यकर्ते, शिवेंद्रराजे फॅन्स आणि नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असं आवाहनही जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ॲपवर असाल तर सोशल मीडिया वापरताना जपून वापरा. तुम्हाला त्याबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल. सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक आणि गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar U Turn : अजित पवार आमचे नेते, असे बोललोच नाही; शरद पवारांचं घुमजाव, तर पुतण्याला दिला 'हा' इशारा
  2. साताऱ्यातील 'त्या' घटनेमागे मोठे कट-कारस्थान; उच्च स्तरीय चौकशी करा - उदयनराजे भोसले
  3. Flying Kiss Video : उदयनराजेंची जिप्सी राईड, चाहत्यांना दिला 'फ्लाईंग किस'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.