कराड (सातारा) - कोयनानगर परिसर मंगळवारी सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या भुकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 एवढी नोंदली गेली आहे. भूकंपामुळे धरणाला कसलाही धोका पोहचलेला नाही.
धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. कोयनानगर परिसराला मंगळवारी सकाळी ७.१६ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ८ कि. मी. अंतरावरील अलोरे (ता. चिपळूण) गावापासून दक्षिणेकडे ६ कि. मी. अंतरावर होता. भूकंपाची खोली ४ कि. मी. होती. यापूर्वी कोयना परिसरात दि. १९ जुलै रोजी २.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.