ETV Bharat / state

केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी; यात्रा, जत्रां, उत्सव, उरुसास जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंध

सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात यात्रा, जत्रां, उत्सव, उरुसास प्रतिबंध लावला आहे. यातूनही कोणी यात्रेच्या ठिकाणी येत असतील व त्यातून गर्दी होणार असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

author img

By

Published : Dec 10, 2020, 9:41 AM IST

satara collector shekhar singh
केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी; यात्रा, जत्रां, उत्सव, उरुसास जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंध

सातारा - केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी आहे. यात्रा, जत्रांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नाही. त्याप्रमाणे म्हसवड येथील सिध्दनाथ व देवी जोगेश्‍वरी देवस्थानच्या रथोत्सवासही परवानगी नाकारण्यात आली आहे.

काय म्हणाले जिल्हाधिकारी शेखर सिंह

कोरोनाचे लॉकडाउन शिथिल करताना केवळ मंदिरे उघडण्यास काही अटी-शर्तींवर परवानगी दिलेली आहे. परंतु यात्रा, जत्रा, उत्सव व उरुसास जिल्ह्यात परवानगी दिलेली नाही. यातूनही कोणी यात्रेच्या ठिकाणी येत असतील व त्यातून गर्दी होणार असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.

यात्रा केल्या रद्द
यापुढील काळात होणाऱ्या जिल्ह्यातील यात्रां व उत्सवांना प्रशासनाची परवानगी मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रशासनाने श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्र व जिल्ह्यातील ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रां व उत्सव भरविण्यावर प्रतिबंध घातले आहेत. वेळोवेळी जिल्हाधिकारी तसेच संबंधित तालुक्‍यांतील प्रांताधिकाऱ्यांनी लेखी अध्यादेश काढून गावोगावच्या यापूर्वीच्या यात्रा रद्द केल्या आहेत.

म्हसवड यात्रेस प्रशासनाचा नकार
म्हसवड येथे पुरातन श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी विवाह सोहळ्याची सांगता मंगळवारी होणार आहे. यापूर्वीच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमांना प्रशासनाने मागील महिन्यात परवानगी दिलेली नाही. यात्रेस प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. ही रथ मिरवणूक यात्रा फक्त आठ दिवसांवर आहे. यापूर्वी जिल्ह्यातील ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रांवर बंदी घालण्याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी, तसेच संबंधित तालुक्‍यांतील प्रांताधिकाऱ्यांनी लेखी अध्यादेश काढून गावोगावच्या यापूर्वीच्या यात्रा रद्द केल्या आहेत.

यात्रा मैदानात व्यावसायिक हजर
सातारा जिल्ह्यात होणाऱ्या यात्रात लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. म्हसवड येथील देवस्थानसह भाविक व व्यवसायिकांमध्ये यात्रेस परवानगी मिळण्याची खात्री आहे. यात्रेस परवानगी मिळण्यापूर्वीच यात्रा मैदानात व्यावसायिक ठाण मांडून आहेत.

३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध कायम
कोरोनाच्या साथीचे रुग्ण म्हसवडसह परिसरातील गावातही रोजच आढळून येत आहेत. यात्रा, जत्रा, उत्सवास प्रशासनाने टाळेबंदी पासून परवानगी दिलेली नाही. याबाबत ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध कायम आहेत.

हेही वाचा - रोजगाराची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक - शिवेंद्रसिंहराजे भोसले

हेही वाचा - नेदरलँडची पॉली जेस्सी साताऱ्यात निघाली कोरोनाबाधित, पोलिसांच्या डोक्याला ताप . . .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.