ETV Bharat / state

तेजस जाधव खंडणी, खून प्रकरण : चार संशयितांवर मोक्का - सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख

सातारा जिल्ह्यातील अष्ट येथील अल्पवयीन तेजस जाधव याचा खंडणीसाठी खून करण्यात आला होता. या प्रकरणी संशयितांवर मोक्का लावण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा
author img

By

Published : Apr 2, 2020, 10:23 AM IST

सातारा - अष्टे येथील अल्पवयीन तेजस विजय जाधव याचा खंडणीसाठी खून करण्यात आली होती. या प्रकरणी चार संशयितांवर मोक्का लावण्यात आला आहे. खंडणी व खूनप्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी चौघांच्या मुसक्या बोरगाव पोलिसांनी स्थनिक गुन्हे शाखेच्या मदतीने आवळल्या होत्या. हे चारही संशयित पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुंड असून त्यांच्या विरोधात बोरगाव, सातारा तालुका, उंब्रज व शाहूपुरी या पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, विनापरवाना बंदूक वापरणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला साहील रुस्तम शिकलगार (वय 21), आशिष बन्सीलाल साळुंखे (वय 23), शुभम संभाजी जाधव (वय 23) आणि अमित राजेंद्र शेख उर्फ गायकवाड (वय 30) अशी कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत. बोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ही मोक्काची पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या चौघा संशयितांविरोधात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. नुकताच विशेष पोलीस महासंचालकांनी या प्रस्तावास मंजुरी दिली.

हेही वाचा - कराडमध्ये पुणे-मुंबईतून ६५० अन् परदेशातून आलेल्या ३३ जणांचे स्टॅम्पिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.