सातारा - जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती सुधारल्याने तब्बल दोन महिन्यानंतर, सोमवारपासून बाजारपेठा खुल्या होणार आहेत. ही सवलत मर्यादित स्वरुपात देण्यात आली असली तरी बाजारपेठेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळनंतरची संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.
सायंकाळी पाच ते पहाटे पाच संचारबंदी
जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या निर्देशानुसार, सातारा जिल्ह्यामध्ये आठवड्याचे सर्व दिवस सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी पाच वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. औषध दुकाने वगळता अत्यावश्यक बाबींची दुकाने, अस्थापना आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र औषध दुकानं सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
यांना मिळाली मुभा
- बाजारपेठेतील इतर दुकाने, अस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
- आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत घरपोच पार्सल सेवा सुरू
- लॉजिंग-बोर्डिंग चालू ठेवण्यास परवानगी असेल तसेच लॉजिंग मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सकाळी 7 ते सायंकाळी 4 या कालावधीतच रेस्टॉरंटमध्ये सेवा देता येईल.
- शासकीय नियम निमशासकीय कार्यालय 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी
- खुल्या जागेतील क्रीडा विषयक बाबी या आठवड्याचे सर्व दिवशी पहाटे 5 तीन 9 वाजेपर्यंत चालू
- व्यायाम शाळा, केस कर्तनालय, सौंदर्य केंद्रे, स्पा ही आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने, आधी भेटीची वेळ ठरवून सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालू ठेवता येतील.
- चित्रीकरणाला इंसुलेशन बबल मध्येच परवानगी
- धार्मिक विधी, कार्य, लग्न- समारंभाला पूर्वीप्रमाणेच उपस्थित लोकांची मर्यादा
- स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभांना 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी
- सार्वजनिक परिवहन बस सेवा शंभर टक्के क्षमतेने चालू, मात्र प्रवाशांना उभे राहून प्रवासास मनाई
- सर्व बाजार समित्या सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू
हे बंदच -
सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. मॉल सिनेमागृहे नाट्यगृहे मात्र बंदच राहणार.