सातारा - कराड पालिकेच्यावतीने सूर्यवंशी मळा येथे ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामध्ये पडल्याने मोटरसायकलस्वाराचा मंगळवारी मृत्यू झाला. विजय पांडुरंग शिंदे (रा. मंगळवार पेठ, कराड), असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे कराडातील नागरिकांमध्ये नगरपालिका आणि ठेकेदाराच्या हलगर्जी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त झाला.
स्वच्छ सर्वेक्षणात उत्तुंग कामगिरी करणार्या कराड नगरपालिकेला शासनाचा मोठा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय शासनाच्या अन्य निधीतूनही कराड शहरातील हद्दवाढ भागात विकासाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत सूर्यवंशी मळा मार्गावर ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहे. त्याठिकाणी ठेकेदाराने दिशादर्शक फलक लावले नव्हते. परिणामी, एक मोटरसायकलस्वार त्या खड्ड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - साताऱ्यात बळीराजावर अवेळी पावसाचे संकट ; कांदा पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यामुळे नागरिक संतप्त झाले. कराड शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे सुरू आहेत. परंतु, त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. रस्त्यांची दुरवस्था, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे कराडकर त्रस्त आहेत. त्यातच एकाला खड्ड्यामुळे जीव गमवावा लागला असून नगरपालिकेच्या अंदाधुंद कारभारावर कराडकरांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा - दुचाकीच्या धडकेत सहा वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू