ETV Bharat / state

Man Arrested Who Killed His Girlfriend : दाजीला गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रेयसीची हत्या, मेव्हुण्यास अटक - SP Ajay kumar Bansal

बहिणीला मारहाण करतो, म्हणून दाजीला गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रेयसीची हत्या करणार्‍या मेव्हुण्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ( Man Arrested Who Killed His Girlfriend ) आहेत. कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव येथे मृतावस्थेत आढळलेल्या तरूणीच्या खून प्रकरणाचा कराड ग्रामीण आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने छडा लावला.

अटक केलेल्या संशयितासमवेत तपास पथक
अटक केलेल्या संशयितासमवेत तपास पथक
author img

By

Published : Jan 5, 2022, 8:52 PM IST

कराड (सातारा) - बहिणीला मारहाण करतो, म्हणून दाजीला गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रेयसीची हत्या करणार्‍या मेव्हुण्याला पोलिसांनी बेड्या ( Man Arrested Who Killed His Girlfriend ) ठोकल्या. कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव येथे मृतावस्थेत आढळलेल्या तरूणीच्या खून प्रकरणाचा कराड ग्रामीण आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ( Satara Police Crime Branch ) शिताफीने छडा लावला. शरद हणमंत ताटे (वय 33, रा. येरवळे, ता. कराड), असे संशयीताचे नाव आहे तर वनिता आत्माराम साळुंखे (वय 30 वर्षे, रा. महिंद, ता. पाटण), असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण..?

कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर कार्वे-कोरेगाव हद्दीत उसाच्या शेताजवळ मंगळवारी (दि. 4 जानेवारी) सकाळी 30 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. त्या युवतीची ओळख पटत नव्हती. मृतदेहाजवळच्या पिशवीत एकाच्या आधारकार्डची झेरॉक्स आणि चिठ्ठी होती. आधारकार्डवर नाव असणार्‍या इसमाकडे चौकशी केली. परंतु, ठोस माहिती मिळत नव्हती. नंतर पोलिसांनी त्याच्या मेव्हुण्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. तसेच बहिणीला त्रास देतो, म्हणून दाजीला गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रेयसीचा खून करून चिठ्ठी आणि आधारकार्डची झेरॉक्स तिच्याजवळ ठेवल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले.

तरुणीची ओळख पटण्याआधी लावला छडा

तरुणीच्या खुनाचा प्रकार उघडकीस आल्यामुळे पोलीस दल हादरून गेले. कारण, गेल्या आठ दिवसात कराड शहर आणि ग्रामीणमध्ये क्राइम रेट वाढला आहे. यामुळे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल ( SP Ajay kumar Bansal ) यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना ( Satara Police Crime Branch ) या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. त्यामुळे पोलिसांनी बारकाईने या घटनेचा तपास केला. खून झालेल्या युवतीची ओळख पटण्याआधीच पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. संशयिताने दिलेल्या माहितीनंतरच त्या तरूणीची ओळख पटली. तरूणीची मिसिंग दाखल नसतानाही पोलिसांनी कौशल्याने खूनप्रकरणाचा अवघ्या चार तासात छडा लावला.

तरूणीचा नाहक बळी

बहिणीला दाजी त्रास देतो म्हणून त्याला गुन्ह्यात अडकविण्यासाठी संशयित शरद ताटे याने प्रेयसीच्या खुनाचा कट रचला. तिला फूस लावून कार्वे-कोरेगाव येथे आणले. तिचा गळा दाबून खून केला. तसेच तिच्या डोक्यात दगड घातला. दाजीच्या आधारकार्डची झेरॉक्स आणि तरुणीच्या नावे लिहिलेली चिठ्ठी तिच्या मृतदेहाजवळ ठेवली. एवढे सगळे करून शेवटी संशयिताचा डाव फसला आणि त्याचा पर्दाफाश झाला. मात्र, यात तरुणीचा नाहक बळी गेला.

हेही वाचा - Satara Corona Update : सातारा जिल्ह्यात 189 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.