ETV Bharat / state

'कोविड मृताच्या अंत्यसंस्कारासाठी प्रति व्यक्ती 5 हजार रुपये अनुदान द्या' - Malkapur corona news

कोविड मृताच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतिव्यक्ती 5 हजार रूपयांचे अनुदान मिळावे, अशी मागणी मलकापूर नगरपालिकेने नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. आतापर्यंत 300 कोविड मृतांवर नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी 9 लाखांचा खर्च नगरपालिका फंडातून केला असल्याचेही नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Malkapur Municipal Council demands fund for corona patient funeral
'कोविड मृताच्या अंत्यसंस्कारासाठी प्रति व्यक्ती 5 हजार रुपये अनुदान द्या'
author img

By

Published : Jun 15, 2021, 10:18 PM IST

कराड (सातारा) - कोविड मृताच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतिव्यक्ती 5 हजार रूपयांचे अनुदान मिळावे, अशी मागणी मलकापूर नगरपालिकेने नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. आतापर्यंत 300 कोविड मृतांवर नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी 9 लाखांचा खर्च नगरपालिका फंडातून केला असल्याचेही नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सातारा जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार कोविड मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सोय करण्यात आली आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, काले प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडाळे ग्रामीण रूग्णालय तसेच येवती प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अखत्यारित येणार्‍या गावांमधील कोरोनाने मृत्यू होणार्‍या नागरीकांवर पाचवडेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मलकापूर नगरपालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार 300 व्यक्तींवर विनाशुल्क अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

एका व्यक्तीवरील अंत्यसंस्काराचा खर्च 5 हजार रूपये आहे. त्यानुसार आतापर्यंत 9 लाख रूपये खर्च नगरपालिकेकडून करण्यात आला आहे. प्रशासन अथवा शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला नाही. मलकापूर नगरपालिकेला संकलित कर व पाणीपट्टी या व्यतिरिक्त कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे नगरपालिकेवर कोविड रूग्णांवरील अंत्यसंस्काराच्या खर्चाचा बोजा पडत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्कारासाठी प्रती व्यक्ती 5 हजाराचे अनुदान मिळावे, असे नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शासनाने हा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शिफारस पत्र दिले आहे. कोविडमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजुक आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होण्यासाठी राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा - गृहराज्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घडवली लोकनेत्यांच्या स्मारकाची सफर

हेही वाचा - 104 वर्षांच्या वृध्दाची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात दिला डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.