ETV Bharat / state

लसीकरणाची माहिती दररोज सार्वजनिक करा; पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचना - सातारा लसीकरण बातमी

उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केल्या जाणार्‍या लसीच्या डोसची माहिती दररोज प्रसिध्द करावी. ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांना तो प्राधान्याने द्यावा. तसेच 18 ते 44 वयोगटासाठी ऑनलाईन प्रक्रियेची सक्ती करू नये, अशा सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.

Make vaccination information public every day said Prithviraj Chavan
लसीकरणाची माहिती दररोज सार्वजनिक करा; पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचना
author img

By

Published : May 17, 2021, 3:11 AM IST

कराड (सातारा) - उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केल्या जाणार्‍या लसीच्या डोसची माहिती दररोज प्रसिध्द करावी. ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांना तो प्राधान्याने द्यावा. तसेच 18 ते 44 वयोगटासाठी ऑनलाईन प्रक्रियेची सक्ती करू नये, अशा सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या. लसीकरणाच्या नियोजनाबाबत कराडच्या शासकीय विश्रामगृहावर चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली.

ऑनलाईन नोंदणी सक्तीची केली जाऊ नये -

कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लसींच्या डोससाठी प्रशासनाने नियमावली तयार करावी, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य द्यावे, 18 ते 44 वयोगटासाठी जी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे, त्या प्रक्रियेमुळे लसीकरणात मोठा गोंधळ निर्माण होत आहे. लसीकरणासाठी कोणत्याही सेंटरला नंबर येत आहे, बाहेरील जिल्ह्यातील लोकांचासुद्धा नंबर सातारा जिल्ह्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, अश्या परिस्थितीत वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी सक्तीची केली जाऊ नये, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. लस मिळाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी गावनिहाय काटेकोरपणे लसीकरण केले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी दिल्या.

लसीकरणाची आकडेवारी रोज सार्वजनिक करा -

शासनाकडून लसीकरणाबाबत योग्य प्रकारे नियमावली तयार करण्यात आली, तर लसीकरणाचा गोंधळ होणार नाही. लसीकरणाची गतीही वाढेल. दररोज जिल्ह्याला लसीचे किती डोस प्राप्त झाले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना व शहरासाठी कशा प्रकारे लसींचे डोस वितरित होतील, याची आकडेवारी सार्वजनिक करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये त्याच दिवशी लस दिली गेली पाहिजे, अशा सक्त सूचनाही चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या.

हेही वाचा - 'माझा डॉक्टरांनी गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.