ETV Bharat / state

Shiv Jayanti 2023 : छत्रपतींच्या कर्तृत्वाचा पोवाडा सातासमुद्रापार; जर्मनीत शिवजयंती जल्लोषात साजरी

author img

By

Published : Feb 19, 2023, 4:36 PM IST

Updated : Feb 19, 2023, 6:15 PM IST

नोकरी-व्यवसायानिमित्ताने जर्मनीत स्थायिक असणार्‍या महाराष्ट्रवासियांनी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी केली आहे. यंदा प्रथमच जर्मनीतील न्युरेमबर्ग या शहरात शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळाला आहे.

Shiv Jayanti 2023
शिवजयंती
जर्मनीत शिवजयंती जल्लोषात साजरी

सातारा: देशात सर्वत्र जल्लोषात शिवजयंती साजरा होत असताना जर्मनीतील न्युरेमबर्ग शहरात देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. नोकरी-व्यवसायानिमित्ताने जर्मनीत स्थायिक असणार्‍या महाराष्ट्रवासियांनी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी केली आहे. महिलांनी शिवजन्माचा पाळणा म्हटला. छत्रपतींच्या पराक्रमाचा पोवाडा तसेच अफजलखान वधाचा देखाव्याने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

न्युरेमबर्ग शहर झाले शिवमय: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशातच नाही तर विदेशातही मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरी झाली. यंदा प्रथमच जर्मनीतील न्युरेमबर्ग या शहरात शिवजयंतीचा जल्लोष पाहायला मिळाला. अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवाराच्या सहकार्याने मराठी विश्व फ्रँकन या मंडळाच्यावतीने जर्मनीत शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शंभरहून अधिक महाराष्ट्रवासीय या शिवजयंती सोहळ्यात सहभागी झाले होते. यानिमित्ताने न्युरेमबर्ग शहरात शिवकाळ अवतरला आणि संपुर्ण परिसर शिवमय होऊन गेल्याची माहिती, न्युरेमबर्गस्थित सातार्‍याचे सुपूत्र अमोल कांबळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक: मराठी विश्व फ्रँकन मंडळाने शिवजयंतीसाठी सदस्यांची नाव नोंदणी केली. त्यानंतर शिवजयंतीमधील कार्यक्रमांच्या सादरीकरणाची तयारी सुरू केली. पारंपारिक वेषभूषेतील महिला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील तरूण आणि मावळ्यांच्या वेशभूषा केलेले तरूण, लेझीम, ढोल-ताशांचा गजरात शिवपुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. या भव्य हॉलमध्ये पोवाडा, स्फूर्तीगीते सादर करण्यात आली. महिलांनी शिवजन्माचा पाळणा म्हटला. यावेळी तरूणांनी अफजलखान वधाचा देखावा सादर करून छत्रपतींच्या पराक्रमाचे दर्शन घडविले. या कार्यक्रमांनी शिवजयंतीचा सळसळता उत्साह जर्मनीकरांना देखील अनुभवायला मिळाला.

छत्रपतींच्या कर्तृत्वाचा पोवाडा सातासमुद्रापार: जर्मनीतील महाराष्ट्रवासिय दरवर्षी गणेशोत्सव दणक्यात साजरा करतात. प्रतिष्ठापना ते विसर्जना दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. या उत्सवातील कार्यक्रम पाहण्यासाठी जर्मन नागरीक कुतूहलाने येतात, अशी आठवण अमोल कांबळे यांनी सांगितली. यंदा शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय मराठी विश्व फ्रँकनने घेतला आणि जल्लोषात शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील महान योध्दा होते. त्यांचे कर्तृत्व, संघर्षमय इतिहास नव्या पिढीला माहित व्हावा, या हेतूने यापुढे शिवजयंती दरवर्षी साजरी करणार असल्याची माहिती अमोल कांबळे यांनी दिली. अमोल कांबळे (सातारा), रश्मी गावंडे (अकोला), शिवराज बाठे (मुंबई), प्रशांत पाटील (चाळीसगाव), ज्योत्स्ना पाटील (कल्याण), प्रशांत गुळस्कर, कल्याणी गुळस्कर (औरंगाबाद), शरद सपकाळ, तृप्ती सपकाळ (नागपूर), संदीप भोकरे (नांदेड), करूणा भोकरे (कल्याण) या महाराष्ट्रवासियांनी शिवजयंती सोहळ्यासाठी पुढाकार घेतला.

हेही वाचा: Shiv Jayanti 2023: पुढील वर्षी कोणत्याही शिवसैनिकांची अडवणूक होणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Last Updated : Feb 19, 2023, 6:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.