ETV Bharat / state

रोजगाराची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक - शिवेंद्रसिंहराजे भोसले - satara shivendrasinharaje bhosale news

साताऱ्यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मीतीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक असल्याचे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी बजाज उद्योग समुहाचे मुख्य व्यवस्थापक राजीव बजाज यांना दिले आहे.

maharashtra-scooters-should-be-started-immediately-said-shivendrasinharaje-bhosale
रोजगाराची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक - शिवेंद्रसिंहराजे भोसले
author img

By

Published : Dec 8, 2020, 6:44 PM IST

सातारा - साताऱ्यातील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या प्लाँटमध्ये इथेनॉलवर चालणार्‍या दुचाकीचे उत्पादन केल्यास, पुन्हा ही कंपनी पुर्ण क्षमतेने सुरु होईल. तसेच बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे याबाबत बजाज उद्योग समुहाने सकारात्मक विचार करून सातार्‍यातील प्लॅंट पुन्हा सुरु करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बजाज उद्योग समुहाचे मुख्य व्यवस्थापक राजीव बजाज यांना निवेदन दिले आहे.

रोजगार निर्मितीची निकड पाहता कंपनी तातडीने सुरु व्हावी -

सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्त्वाची कंपनी आहे. सुमारे ४५ एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळाला होता. मात्र, या कंपनीचे कामकाज बंद अवस्थेत आहे. सातार्‍यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे. बजाज उद्योग समुहामार्फत इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी निर्मिती करण्यात येत असल्याचे समजले आहे. ही बाब आनंददायी आणि स्वागतार्ह असून इथेनॉलवर चालणार्‍या दुचाकीचे उत्पादन सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या प्लँटमध्ये सुरु करावे, असेही शिवेंद्रसिंहराजे निवेदनात म्हटले आहे.

शेतकर्‍यांनाही ऊसालाही दर मिळेल -

सातार्‍यातील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान-मोठे उद्योग सध्या बंद आहेत. यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे. ही कंपनी पुन्हा सुरु झाल्यास त्यावर अवलंबून असणाऱ्या लहान-मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. सुशिक्षित आणि गरजूंना रोजगार मिळेल. सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने इथेनॉलची निर्मीती करत आहेत. पर्यायाने शेतकर्‍यांनाही ऊसदर मिळत आहे. सातार्‍यातील औद्योगिक क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी ही कंपनी सुरु होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे याबाबत आपण तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि सातारा येथील प्लँट पुन्हा सुरु करावा, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - उत्तराखंड निवासस्थान घरभाडे प्रकरण : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.