सातारा : महाबळेश्वरला पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांना ऑनलाईन बुकींगद्वारे ( Tourists coming to Mahabaleshwar ) हॉटेलचे आरक्षण करणे चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन बुकींगच्या माध्यमातून पर्यटकांची लाखो रूपयांची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात ( Mahabaleshwar police station ) तक्रार नोंदविण्यात आली आहे.
बनावट पेज तयार करून फसवणूक महाबळेश्वरमधील हॉटेल्सच्या नावाने ( fake webpages of tourist websites ) बनावट पेज तयार करून अथवा हॉटेल्सची साईट हॅक करून पर्यटकांची फसवणूक करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अशा साईटवर गुगल पे बँक अकौंट नंबर देण्यात येतो. आरक्षणाच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक करण्यात येत आहे. सध्या गुगलसह इतर साईटसच्या माध्यमातून हॉटेलची रूम ऑनलाईन आरक्षित करणे सहज शक्य असल्याने ऑनलाईन आरक्षणाचे प्रमाण वाढले आहे. याचाच गैरफायदा सायबर चोरांकडून घेतला जात आहे.
दिवाळी सुट्टीमुळे महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी दिवाळीच्या सुट्टीमुळे ( fraud in online reservation ) महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबई, पुण्यासह परराज्यातून येणार्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. याचाच गैरफायदा घेत सायबर चोरांनी महाबळेश्वरमधील काही हॉटेल्सचे बनावट पेज तयार करून त्यावर आपले अकाऊंट नंबर आणि गुगल पे नंबर दिले आहेत. त्या आधारे ऑनलाईन पैसे मागवून हॉटेलच्या नावाने आरक्षित रूमची खोटी रिसीट तयार करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पर्यटकांना पाठवली जात आहे. ऑनलाईन बुकिंगनंतर हॉटेलवर आल्यानंतर पर्यटकांच्या नावाने बुकिंगच नसल्याचा प्रकार उघडकीस येतो. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पर्यटकांना समजते.
पुणे, गुजरातच्या पर्यटकांना गंडा एमटीडीसीतर्फे महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये अमित संघवी (अहमदाबाद, गुजरात) या पर्यटकास 59 हजार रुपये. श्रेयस नाईक या पर्यटकास 17,500 रविशंकर (चिंचवड, पुणे) यांना 97 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. अशा अनेक पर्यटकांची लाखो रूपयांची फसवणूक झाली आहे. तक्रार अर्जांमध्ये भामट्याचा नंबर, येस बँकेचा खाते क्रमांक आणि आयएफसी कोड देखील देण्यात आला आहे. मागील दोन-तीन दिवसांत बनावट पेजद्वारे पर्यटकांची तब्बल तीन ते चार लाख रुपयांहून अधिक फसवणूक झाली आहे.
पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन : हॉटेल्सची साईट हॅक करून अथवा नव्याने हॉटेलचे पेज तयार करून ही फसवणूक करण्यात येत आहे. यासंदर्भात एमटीडीसीसह ब्राइटलॅन्ड हॉटेल व्यवस्थापनाने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ऑनलाईन बुकींगद्वारे हॉटेल रूमचे आरक्षण करताना पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक सुहास पारखी यांनी केले आहे.