सातारा - महाएनजीओ फेडरेशन ही राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये मदतीचा हात देत आहे. प्रामुख्याने पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, जालना या जिल्ह्यात संस्थेच्या वतीने मोठे काम सुरू आहे. श्रीश्री रविशंकर (आर्ट ऑफ लिव्हींग) व श्रीशेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली या फेडरेशनची स्थापना होऊन महाराष्ट्र राज्यातील १ हजार ५०० स्वयंसेवी संस्था यात कार्यरत आहेत. लॉकडानऊच्या दुसऱ्या दिवसापासून पुणे, मुंबई व वरील सर्वच जिल्ह्यांमध्ये सक्रीय होऊन प्रत्येक गरजूपर्यंत फूड पॅकेट देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
आजपर्यंत ५ हजारहुन अधिक पॅकेट्स नियमित दिले जात आहेत. बेघर व स्थलांतरीत कुटुंबाची समस्या लक्षात घेता १० हजाराहुन अधिक फॅमिली किट दिल्या जात आहेत. राज्यातील अनेक वृद्धाश्रम व अनाथआश्रम, कुष्ठरोगी निवास विभाग यांचे पालकत्व फेडरेशनने घेतले आहे. त्यात पुणे व सातारा परिसरातील संस्थांचा समावेश आहे.
राज्याचा आढावा घेता ठिकठिकाणी वारकरी सांप्रदायातील मंडळी अक्षयमहाराज भोसले यांच्या विंनतीवरुन स्थानिक पातळीवर मदत उपलब्ध करुन देत आहेत. संत वचन केवळ सांगण्यापूरते नसून तसे आचरण अक्षय महाराज भोसले आपल्या कृतीतून समाजास दाखवून देत आहेत. आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराचे सुद्धा यात मोठे योगदान आहे.
'माझा देश माझी जबाबदारी'-
राज्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्त टंचाई असल्याचे सांगताक्षणी पुण्यात १३० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्त दान केले. ऊसतोड कामगार असो अथवा निवासी विद्यार्थी महाएनजीओ प्रत्येकाच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली पहायला मिळत आहे. समाज देतोय आम्ही केवळ माध्यम आहोत. समाजाचे प्रत्येकाचे देणे लागते ते देण्याचा प्रयत्न करतो कारण 'माझा देश माझी जबाबदारी' हे आपलं कर्तव्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. फेडरेशनचे विजय वरुडकर, शशांक ओंबसे, राहुल पाटील, मुकुंद शिंदे, नारायण फड, वैभव मोगरेकर, अमोल उंबरगे आदि प्रत्येक जिल्ह्यात समनव्य साधून पूर्ण वेळ आपले योगदान देत आहेत.