सातारा : राज्यातील सत्तांतरात जिल्ह्यातील दोन नेत्यांचे पक्षांतर, वाईन विक्रीच्या परवानगीवरून बंडातात्यांचे वादग्रस्त वक्तव्य, अफलजलखान कबर परिसरातील कारवाई, उदयनराजेंची शिवसन्मान निर्धार यात्रा, वाधवान बंधूंच्या बंगल्यावरील सीबीआय छापा,निजामाच्या बंगल्यावर कारवाई, मॅरेथॉन स्पर्धेत धावपटूचा मृत्यू, बिबट्या आणि मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा बळी, अशा घटनांनी सातारा जिल्ह्याचे सरते वर्ष धक्कादायक ( Look Back 2022 ) ठरले. वागशिर पाणबुडीच्या वातानुकुलित यंत्रणेची कराडात झालेली निर्मिती, ७५ विधवांच्या हस्ते ध्वजारोहण, जिल्ह्याच्या सुपुत्राची कॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती, स्वच्छ सर्वेक्षणातील चमकदार यश, पट्टेरी वाघ, शेकरूचे दर्शन आणि जल्लोषात झालेला शिवप्रताप दिन, या घटनांनी सरते वर्ष लक्षात ( Eknath Shinde Become Maharashtra CM ) राहिले.
रशिया-युक्रेन युद्धात विद्यार्थ्यांची होरपळ : रशिया-युक्रेन युध्दामुळे सातार्यातील ५० जण युक्रेनमध्ये अडकले (Satara Student Suffer Russia Ukraine war ) होते. त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. बचावासाठी विद्यार्थ्यांना बंकरचा आधार घ्यावा लागला. सोशल मीडियाच्या माध्यमातून युक्रेनमधील युद्धाची दाहकता विद्यार्थ्यांनी दाखवली. खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हा प्रशासन परराष्ट्र मंत्रालय आणि दिल्लीतील नियंत्रण कक्षाच्या संपर्कात होते. त्यामुळे सर्वांना सुखरूप परत आणण्यात यश आले.
![Satara Student Suffer Russia Ukraine war](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_563.jpg)
वागशिर पाणबुडीला कराडची वातानुकुलित यंत्रणा : भारतीय नौदलात दाखल झालेल्या अत्याधुनिक वागशिर पाणबुडीचे एप्रिल महिन्यात जलावतरण (Vagashir submarine Indian Navy ) झाले. या पाणबुडीत कराडमध्ये निर्मिती झालेली वातानुकुलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. कराडसारख्या ग्रामीण भागातील श्री रेफ्रिजरेशन इंडस्ट्रिजला वातानुकुलित यंत्रणेचे टेंडर मिळाले होते. ४० टक्के देशी तंत्रज्ञानावर तयार झालेल्या पाणबुडीतील वातानुकुलित यंत्रणेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कराडच्या श्री रेफ्रिजरेशनची निविदा मंजूर झाली होती.
![Vagashir submarine inducted into Indian Navy](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_424.jpg)
बंडातात्यांच्या वक्तव्याने राज्यभर आंदोलन : सरत्या वर्षाची सुरूवात निषेध, आंदोलनाने झाली. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात बंडातात्या कराडकरांनी सुप्रिया सुळे, तत्कालिन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मुलाचा नामोल्लेख करून नेत्यांची मुले दारू पितात, असे वक्तव्य केले. त्याचे राज्यभर पडसाद उमटून निषेध आणि आंदोलने झाली. बंडातात्यांनी माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला.
![Movement across the state on the statement of the rebels](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_316.jpg)
खाशाबांच्या जयंतीदिनी राज्य क्रीडा दिन : देशाला कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले. ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्या दिवंगत खाशाबा जाधव ( Khashaba Jadhav Birth Anniversary ) यांची जयंती ( दि. १५ जानेवारी ) राज्य क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने ( Maharashtra State Sports Day ) घेतला. तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला होता. १५ जानेवारी २०२३ पासून दरवर्षी खाशाबांची जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून साजरी होणार आहे.
![Khashaba Jadhav Birth Anniversary](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_556.jpg)
पाटण, कोरेगावचे आमदार शिंदेंच्या गोटात : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश ( Satara MLA In Shinde group ) होता. शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर शंभूराज देसाई यांना उत्पादन शुल्क खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदी बढती तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ( Eknath Shinde Become Maharashtra CM ) मिळाले. आ. महेश शिंदे मात्र वेटींगवरच राहिले.
![Patan MLA Shambhuraj Desai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_1080.jpg)
![MLA Mahesh Shinde](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_221.jpg)
अफजलखान कबरीचे उदात्तीकरण जमीनदोस्त : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे प्रशासनाने शिवप्रतापदिनाच्या पहाटे जमीनदोस्त ( Action Removing Encroachment Near Afzal Khan Grave ) केली. अतिक्रमण हटाव कारवाई संपुर्ण राज्यभर गाजली. कबरीचा परिसर अतिक्रमणमुक्त केल्यानंतर तेथे आणखी दोन कबरी आढळल्या. अतिक्रमण पाडल्याच्या विरोधात याचिका दाखल झाली. सातारा जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन करून याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने बंद करून सरकार आणि प्रशासनाला दिलासा दिला.
![Action Removing Encroachment Near Afzal Khan Grave](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_874.jpg)
![Action Removing Encroachment Near Afzal Khan Grave](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_453.jpg)
पट्टेरी वाघ, अस्वल, शेकरूचे दर्शन : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्याने एप्रिल महिन्यात पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करतात. त्यामुळे वाघाची नोंद ही महत्वपूर्ण ठरली. कोयना अभयारण्यात पर्यटकांना अस्वलाचे (स्लॉथ बेअर) आणि महाबळेश्वरमध्ये राज्यप्राणी शेकरूचे देखील दर्शन झाले.
![Sighting of a striped tiger](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_711.jpg)
बिबट्या, कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्यांचा मृत्यू : सरत्या वर्षात बिबट्या आणि मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा बळी गेल्याच्या दोन विदारक घटना घडल्या. येणके (ता. कराड) गावात ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला उसाच्या शेतात नेऊन ठार केले. त्यानंतर नजीकच्याच किरपे गावात एका चिमुकल्याची मान तोंडात धरून त्याला फरफटत नेताना मुलाच्या वडीलांने धाडसाने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले. त्यानंतर कराड शहरात भटक्या कुत्र्यांनी एका मजुराच्या मुलाचे लचके तोडून त्याचा जीव घेतला. यामुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला.
![Toddlers die in leopard](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022160245_2512f_1671964365_248.jpg)
वाधवान बंधूंसह निजामाच्या बंगल्यावर कारवाई : पीएमसी, एचडीआयएलमधील हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील अलिशान बंगल्यावर सीबीआयने छापा मारला. बंगल्यातून कोट्यवधी रूपये किंमतीची परदेशी पेंटिग्ज-पोट्रेट ताब्यात घेतली. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मायणी येथील संस्थेत तत्कालीन संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या तक्रारीवरून मेडिकल कॉलेजचे माजी अध्यक्ष एम. आर. देशमुख यांना ईडीने अटक केली. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने हैदराबादच्या निजामाची महाबळेश्वरमधील २५० कोटीची मालमत्ता सील करण्यात आली.
अनैतिक व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश : तेलंगणा पोलिसांनी छापे मारून अनैतिक व्यापारासाठी मुली पुरविणार्या रॅकेटचा पर्दाफाश केला. राजस्थान, मुंबई आणि सातार्यात ही कारवाई केली. रचाकोंडा पोलिसांनी कराडमधील लॉजवरून एका बांगलादेशी मुलीला ताब्यात घेऊन अनैतिक व्यापारातून तिची सुटका केली. सरत्या वर्षात सातारा जिल्ह्यात झालेली ही मोठी कारवाई ठरली. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यातील मानवी तस्करीचा भांडाफोड देखील झाला.
माजी न्यायमूर्तींची कॅटच्या अध्यक्षपदी नियुक्ती : सातारा जिह्यातील निमसोड (ता. खटाव) गावचे सुपूत्र आणि मेघालय उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रणजित मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या (कॅट) अध्यक्षपदी नियुक्ती ( Ranjit More CAT Chairman ) झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. रणजित मोरे यांच्या निवडीने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांनी त्यांच्या अभिनंदनाचे ठराव घेतले. कॅटसारख्या देशपातळीवरील लवादाच्या अध्यक्षपदाचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला.
![Ranjit More appointed as Chairman of CAT](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022161414_2512f_1671965054_437.jpg)
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन : सातारच्या छत्रपती घराण्यातील श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि राजमाता सुमित्राराजे भोसले यांचे ते सुपूत्र आणि खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते चुलते होते. त्यांनी सातार्याचे नगराध्यक्ष भूषविले होते. कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात त्यांचे योगदान होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष आणि जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यांची एक्झिट सातारकरांना चटका लावून गेली.
![Bangalore Bulls team player](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022161414_2512f_1671965054_13.jpg)
मॅरेथॉनमध्ये धावताना राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू : सरते वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी धक्कादायक ठरले. सातार्यातील ११ व्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत धावताना कोल्हापूरच्या राज पटेल या राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडूचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत कोल्हापूर परिक्षेत्र क्रीडा स्पर्धेसाठी साताऱ्यात आलेल्या कोल्हापूर पोलीस दलातील महेश मगदूम या कब्बडीपटूवर तरूणीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. प्रो-कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्स संघाचा तो व्यावसायिक खेळाडू होता. या दोन्ही घटना क्रीडा क्षेत्रासाठी धक्कादायक ठरल्या.
![clean survey Karad Panchgani](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-lastyearedcbiraidsalongwiththedefectionoftwomlasinsataradistrictwereshocking-10054_25122022161414_2512f_1671965054_932.jpg)
स्वच्छ सर्व्हेक्षणात कराड, पाचगणीचा डंका : स्वच्छ सर्व्हेक्षणात दोन नगरपालिकांनी देशपातळीवर यशाची मोहोर उमटवली. कराड नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात देशात तृतीय ठरली तर हिल स्टेशन असलेले पाचगणी देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले. कराड आणि पाचगणी नगरपालिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्याची देशात घोडदौड कायम राखली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन्ही नगरपालिकांना गौरविण्यात आले.