ETV Bharat / state

Bribe Case in Satara: साताऱ्यात वकिलाला एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले; न्यायालयीन वर्तुळात खळबळ - वकिलाला लाच घेताना अटक

शिक्षण संस्थेच्या दिवाणी दाव्याचा निकाल संस्थेच्या बाजूने लावून देण्यासाठी संस्था अध्यक्षाकडून एक लाखाची लाच घेताना सातारा जिल्हा न्यायालयातील वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विलास बाळकृष्ण कुलकर्णी, असे संशयित वकिलाचे नाव आहे. पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Bribe Case in Satara
न्यायालयीन वर्तुळात खळबळ
author img

By

Published : May 15, 2023, 11:00 PM IST

सातारा: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लाच मागितल्याची खात्री करण्यात आली. साताऱ्यातील भवानी पेठेत असलेल्या वकीलाच्या खासगी ऑफिसमध्ये तक्रारदाराकडून एक लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वकिलाला रंगेहाथ पकडले.

साताऱ्यात कारवाईचा धडाका: गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल, वीज वितरण खात्यातील लाचखोरांना रंगेहाथ पकडले आहे. मात्र, लाचखोरीचे सत्र थांबलेले नाही. न्यायदानाच्या क्षेत्रात देखील लाचेची मागणी होत असल्याने संपूर्ण सरकारी यंत्रणा लाचखोरांमुळे पोखरली गेली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

लिपिकाला 21 हजाराची लाच घेताना अटक: अलिबाग येथील रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालयात दाव्याची साक्षांकित प्रत देण्यासाठी मागितलेल्या 21 हजाराची लाच घेताना कार्यालयातील लिपिकास लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. प्रशांत मांडलेकर (वय. 28 रा. धोंडखार, रोहा) असे लिपिकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण? अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावर ग्राहक तक्रार निवारण मंच न्यायालय आहे. या न्यायालय कार्यालयात प्रशांत मांडलेकर हे लिपिक पदावर काम करत होते. तक्रारदार यांचा ग्राहक न्यायालयात दावा सुरू असून दाव्याची साक्षांकित प्रत मिळण्यासाठी प्रशांत मांडलेकर यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, अनेक दिवस गेले तरी मांडलेकर यांनी प्रत दिली नव्हती. त्यानंतर तक्रारदार हे मांडलेकर यांना भेटले असता साक्षांकित प्रत देण्यासाठी मांडलेकर यांनी 21 हजाराची लाचेची मागणी केली होती.

लिपिक अडकला सापळ्यात: तक्रारदार यांनी मांडलेकर यांनी मागितलेल्या लाचेबाबत अलिबाग येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. तक्रारदार हे लाचेची रक्कम लाचखोर मांडलेकर यांनी स्वीकारताना दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलिस हवालदार बाळकृष्ण पाटील, विश्‍वास गंभिर, कौस्तुभ मगर, जितेंद्र पाटील, सुरज पाटील, स्वप्नाली पाटील, निशांत माळी, महेश पाटील यांनी प्रयत्न केले.

हेही वाचा:

  1. Akola Violence : अकोला हिंसाचार प्रकरणी 100 हून अधिक जण ताब्यात; इंटरनेट सेवा बंद, पोलिसांनी काढला रुट मार्च
  2. Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार?
  3. CM Eknath Shinde on Riots : अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.