सातारा - जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. शनिवारी रात्री जाहीर झालेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात 1 हजार 778 नव्या रुग्णांची भर पडली. तर 43 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 924 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात १ हजार ७७८ नवे रुग्ण आढळले. यामध्ये जावली 77, कराड 202, खंडाळा 92, खटाव 182, कोरेगांव 163, माण 140, महाबळेश्वर 47, पाटण 67, फलटण 193, सातारा 418, वाई 169 व इतर 28 रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये जावली 2, कराड 9, खटाव 5, कोरेगाव 1, माण 5, पाटण 3, फलटण 2, सातारा 11 आणि वाई 5 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 185 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 924 रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.