सातारा - जिल्ह्यात काल (सोमवार) रात्री 12 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 1 हजार 666 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यू झाला. तसेेेच सातारा तालुका हा जिल्ह्यात हाॅटस्पाॅट निर्माण झाला आहे. सातारा तालुक्यात सर्वाधिक 367 रुग्ण आढळले. आत्तापर्यंत सातारा तालुक्यात सर्वाधिक 22 हजार 167 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मृतांमध्येही हाच तालुका (708) पुढे आहे. काल सातारा तालुक्यात 11 मृत्यू झाले. बाधितांची आकडेवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
फलटणला काल 151 रुग्ण आढळले. तर आतापर्यंत सर्वाधिक 12 हजार 134 रुग्ण याच ठिकाणी आढळले. काल कोरोना बाधितांमध्ये जावली 149, कराड 258, खंडाळा 74, खटाव 142, कोरेगांव 78, माण 123, महाबळेश्वर 3, पाटण 119, फलटण 151, सातारा 367, वाई 147 व इतर 27 इतके रुग्ण आढळले.
साताऱ्यात मृत्यूचे प्रमाण अधिक
काल मृत्यूमध्ये जावली 1, कराड 6, खंडाळा 3, खटाव 5, कोरेगांव 1, माण 2, फलटण , सातारा 11 (आतापर्यंत 708), वाई 2 यांचा समावेश होता.