सातारा - सातार्यातील मांढरदेवी (ता.वाई) घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.
मांढरदेवी घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत घाटातील मोठ मोठाले दरड रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला होता. सुदैवाने ही घटना घडताना तिथून कुठलेही वाहन ये-जा करत नसल्याने मोठा अपघात टळला. मात्र दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. मांढरदेव येथून सकाळी घाट उतरून वाई एमआयडीसीत कामाला येणारे चाकरमानी व दुध विक्रेते आदींच्या वाहने अडकून पडली होती. वाई मांढरदेव घाटात कोचळेवाडी गावच्या हद्दीत ही दरड कोसळली.
दरम्यान, स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला या घटनेची माहिती मिळताच, प्रशासनाने त्वरीत घटनास्थळ घटनास्थळी रस्त्यावरील दरड हटवून रस्ता मोकळा केला. यामुळे आता घाटातील वाहतूक सुरळीत सुरु आहे. उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने दरड हटवन्याचे काम सुरू होते.
सातारा : मांढरदेवी घाटात दरड कोसळली
मांढरदेवी घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत घाटातील मोठ मोठाले दरड रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला होता. सुदैवाने ही घटना घडताना तिथून कुठलेही वाहन ये-जा करत नसल्याने मोठा अपघात टळला.