सातारा - महाबळेश्वर, प्रतापगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे आंबेनळी घाटामधील दुदोशी गावाच्या हद्दीजवळ रस्ता खचला आहे. तसेच घाटमार्गात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे महाबळेश्वर-कुंभरोशी हा घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून रस्ता हलक्या वाहनासाठी खुला केला आहे. अशीच परिस्थिती कुंभरोशी-पोलादपूर रस्ताची झाली आहे. रान कडसारी ते प्रतापगड फाट्या दरम्यान दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पोलादपूर तालुक्यात गेल्या 6 ते 7 दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. त्यामुळे नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे महाबळेश्वर-प्रतापगड मार्गाची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा, कोकण तसेच 53 गावांचा संपर्क तुटू शकतो.