ETV Bharat / state

कराडमध्ये रोज होणार कोरोनाच्या 200 चाचण्या; कृष्णा हॉस्पिटलमध्ये अद्ययावत उपकरणे दाखल - कृष्णा हॉस्पिटलमध्ये 2 उपकरणे दाखल

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीसाठीची स्वयंचलित आरएनए एक्स्ट्रॅक्टर आणि सीएफएक्स 96 रिअल टाईम पीसीआर ही दोन अत्याधुनिक उपकरणे दाखल झाली आहेत. त्यामुळे रोज 200 कोरोना चाचण्या करणे शक्य होणार आहे.

equipment for corona test
कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली उपकरणे
author img

By

Published : Jul 22, 2020, 7:15 AM IST

कराड (सातारा) - कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीसाठीची २ अद्ययावत उपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे रोज 200 कोरोना चाचण्या करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक उपकरणांमुळे कोरोना चाचणीच्या गुणवत्तेतही वाढ होणार असल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यात आघाडीवर असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीच्या मोहिमेत सातत्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करण्याबरोबरच कृष्णा हॉस्पिटलने कोरोना लस संशोधनात सहभाग घेत कोरोना चाचणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन परिषदेने कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिल्यानंतर कृष्णा हॉस्पिटलने आत्तापर्यंत 2 हजार 606 इतक्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. आतापर्यंत दिवसाला 40 ते 60 इतक्याच कोरोना चाचण्या होत होत्या. परंतु, दोन अत्याधुनिक उपकरणांमुळे चाचण्यांमध्ये चार पटीने वाढ होणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कृष्णा हॉस्पिटलने तातडीने नवीन २ अद्ययावत उपकरणे खरेदी केली. त्यानुसार कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या 'मोल्युक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक्स' या विभागात स्वयंचलित आरएनए एक्स्ट्रॅक्टर आणि सीएफएक्स 96 रिअल टाईम पीसीआर ही दोन अत्याधुनिक उपकरणे दाखल झाली आहेत.या उपकरणांमुळे प्रयोगशाळेची कार्यक्षमता वाढणार असून, चाचणी प्रक्रिया व गुणवत्ता सुधारणार आहे.

सीएफएक्स 96 रिअल टाईम पीसीआर या उपकरणामुळे तर एकाचवेळी 96 नमुन्यांवर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. तसेच नवीन उपकरणांमुळे आता प्रतिदिन 150 ते 200 कोरोना चाचण्या करणे शक्य होणार असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.