ETV Bharat / state

पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे बंद; 95.79 टीएमसी पाणीसाठा - कोयना पाणलोट क्षेत्र

रविवारपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. धरणात आजच्या घडीला फक्त 2 हजार 100 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. तर धरणात 95.79 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

Koyna dam gates closed for water release satara
पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे बंद
author img

By

Published : Aug 25, 2020, 7:48 AM IST

सातारा - कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरल्याने शिवाजी सागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. धरणात केवळ 2 हजार 100 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत असल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सोमवारी सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2 हजार 100 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या धरणात आजच्या घडीला 95.79 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असल्याची माहिती धरण व्यवस्थापन सुत्रांनी दिली.

गेल्या चार दिवसांपूर्वी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने शिवाजी सागर जलाशयात पाण्याची आवक तब्बल 61 हजार 361 क्युसेक प्रतिसेकंदपर्यंत गेली होती. त्यामुळे धरणाचे दरवाजे शुक्रवार 21 रोजी दीड फुटाने उघडले व नंतर आवक वाढतच गेली. त्यामुळे पाणीसाठ्यावर नियंत्रण राखण्यासाठी सायंकाळी 5.30 वाजता पुन्हा धरणाचे दरवाजे दीड फुटावरून 4 फुटाने उचलून कोयना नदीपात्रात 25 हजार 399 क्युसेक्स प्रतिसेकंद व धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100, असा एकूण 27 हजार 499 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला होता.

रविवारपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. धरणात आजच्या घडीला फक्त 2 हजार 100 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे, तर धरणात 95.79 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सोमवारी सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी बंद करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यानुसार आता केवळ पायथा वीजगृह चालू असून त्यातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू ठेवण्यात आला आहे. धरणात जेवढे पाणी येत आहे तेवढेच पाणी नदीपात्रात सोडून दिले जात आहे.

कोयना धरण 91.02 टक्के भरले आहे. दरम्यान, कोयना धरणाच्या गेटमधून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याने कोयना, केरा, काजळी, काफना नद्यांसह इतर नद्यांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली असून कोयना नदीवरील सर्व पूल पाण्याबाहेर आल्याने ते वाहतुकीस पूर्ववत खुले झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.