ETV Bharat / state

Koyna Dam Catchment Area : कोयना धरणात प्रतिसेकंद 6468 क्युसेक पाण्याची आवक; पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला - 14 TMC Waterstoarage

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कोयना धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला होता. परंतु, आता कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणात ( Koyna Dam Catchment Area ) पाण्याची आवक सुरू ( Water Inflow Continues in Dam ) झाली असून, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातदेखील चांगला पाऊस सुरू झाला आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद 6468 क्युसेक पाण्याची आवक ( 6468 Cusecs per Second ) सुरू झाली आहे. धरणात सध्या 13.97 टीएमसी पाणीसाठा ( 13.97 TMC Waterstoarage ) आहे.

Koyna Dam catchment area
कोयना धरण पाणलोट क्षेत्र
author img

By

Published : Jul 2, 2022, 11:26 AM IST

सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात ( Koyna Dam Catchment Area ) पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातदेखील चांगला पाऊस सुरू झाला आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद 6468 क्युसेक पाण्याची आवक ( 6468 Cusecs per Second ) सुरू झाली आहे. धरणात सध्या 13.97 टीएमसी पाणीसाठा ( 13.97 TMC Waterstoarage ) आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील ओझर्डे धबधबा

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचे लक्ष लागून असणार्‍या कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातदेखील चांगला पाऊस सुरू झाला आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद 6468 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणात सध्या 13.97 टीएमसी पाणीसाठा आहे.

आवक सुरू झाल्याने आशा पल्लवीत : महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाचा कणा असणार्‍या कोयना धरणातील पाणीसाठ्यात झालेली कमालीची घट ही चिंताजनक आहे. यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. जून महिना कोरडा गेल्यामुळे धरणात पाण्याची आवकच झाली नाही. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे आगमन झाल्यामुळे तसेच पावसाचा जोर वाढल्यामुळे कोयना धरणात आता पाण्याची आवक सुरू झाली आहे. यामुळे उद्योगविश्वाच्या आशादेखील पल्लवीत झाल्या आहेत.

जूनमध्ये पाण्याअभावी लाँच सेवा बंद : संपूर्ण जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कोयना धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे. पोट खपाटीला गेल्यासारखी कोयना जलाशयाची अवस्था झाली आहे. बुडीत क्षेत्रातील गावांचे अवशेष उघडे पडले आहेत. पाणीच नसल्यामुळे लाँच सेवाही बंद आहे. त्यामुळे तापोळा, कांदाटी खोर्‍यात जलाशयाच्या आत असणार्‍या गावांतील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नदीपात्रातील विसर्गात घट : कोयना धरणात सध्या केवळ 13.97 टीएमसी (13.27 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. या परिस्थितीतदेखील धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. त्यामध्ये घट झाली आहे. सध्या 1600 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. मागील चोवीस तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 54 मिलीमीटर, नवजा येथे 88 मिलीलीटर आणि महाबळेश्वर येथे 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात प्रतिसेकंद 6468 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.

ओझर्डे येथे धबधबा कोसळू लागला : पावसाच्या आगमनामुळे कोयना परिसरातील ओझर्डे येथे धबधबा कोसळू लागला आहे. कोयना धरण परिसरातील नवजाचा ओझर्डे धबधबा हा महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण ठरतो. हा धबधबा प्रवाहीत झाल्यामुळे पर्यटकांची पावले ओझर्डे धबधब्याकडे वळू लागली आहेत. त्याचबरोबर कोयना परिसरातील छोटे धबधबे कोसळू लागली आहेत. फेसाळत कोसळणारे हे धबधबे कोयना परिसराचे सौंदर्य खुलावत आहेत.

हेही वाचा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाची दडी, केवळ 16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.