सातारा (कराड) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार परतीचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह कार्यान्वित करून 2100 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आता हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार पावसाचा जोर वाढला, तर धरणाचे वक्र दरवाजेही उघडले जाणार आहेत, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापन सतर्क झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे कोयना धरणाचे पायथा वीजगृह कार्यान्वित करून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. पाऊस सुरू झाला, तर दरवाजेही उघडले जातील, असे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
कोयना धरणात सकाळी 11 वाजता 104.60 टीएमसी एवढा पाणीसाठा होता. धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणात येणार्या पाण्यावर पायथा वीजगृहात वीजनिर्मिती करून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. सध्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे पाऊस पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. पावसाची परिस्थिती पाहून दरवाजे उघडण्यात येणार आहेत.
कोयना धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित.. 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू - कोयना धरण वीजगृह
कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह कार्यान्वित करून 2100 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पाऊस सुरू झाला, तर दरवाजेही उघडले जातील, असे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.