सातारा - नेर फाटा ते ललगुन या रस्त्याचे काम आमदार महेश शिंदे यांनी महायुतीच्या काळामध्ये मंजूर करून घेतले होते. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे आमदारांनी त्याठिकाणी भेट दिली आणि कॉन्ट्रॅक्टरने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. ठेकेदाराला सज्जड दम भरत माती नीट झाडुन का नाही घेत माकडा पहिल्यादा झाडून घे असा दम भरला आहे.
कोरेगाव मतदारसंघांमध्ये होणारी कामे उत्कृष्ट दर्जाची असली पाहिजेत अशी आग्रही मागणी आमदार महेश शिंदे यांची आहे. त्यामुळे कोरेगावचा शाश्वत विकास निश्चित आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि सरकारी अधिकारी एकत्र येऊन अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करत आहेत. याला पायबंद कोरगाव मतदारसंघांमध्ये घालायचा असून सर्व मतदारसंघातील प्रमुखांना आव्हान करण्यात येत आहे. सर्वांनी ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होईल त्या ठिकाणी आंदोलन करून ते उत्कृष्ट करण्यासाठी भाग पाडावे, असे देखील त्यांनी सांगितले आहे.