ETV Bharat / state

किल्ले प्रतापगड पर्यटनासाठी बंद - प्रतापगडावरील सर्व दुकाने हॉटेल पर्यटनासाठी पूर्णतः बंद

सातारा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड हा 31 तारखेपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.

kille-pratapgad-close
किल्ले प्रतापगड पर्यटनासाठी बंद
author img

By

Published : Mar 19, 2020, 3:06 PM IST

सातारा - प्रतापगडावरील सर्व दुकाने हॉटेल पर्यटनासाठी पूर्णतः बंद करून कोरोना व्हायरस बाबत पूर्णतः खबरदारी घेण्यात आली आहे. देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा व पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगडावर अनेक देश-विदेशातून पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे किल्ले प्रतापगड नेहमीच पर्यटकांकडून गजबजलेला असतो.

किल्ले प्रतापगड पर्यटनासाठी बंद

छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा इतिहास पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक देश-विदेशातून या किल्ले प्रतापगडाकडे येत असतात. मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार स्थानिक व्यापाऱ्यांनी व प्रतापगडावर राहणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी पर्यटनासाठी किल्ले प्रतापगडावर तूर्त कोरोना व्हायरसच्या भीतीने बंदी घातली आहे. यामुळे किल्ले प्रतापगडावर टेहळणी बुरुज यासह इतर सर्व पॉईंट वर शुकशुकाट दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.