ETV Bharat / state

MLA Prithviraj Chavan : कर्नाटकचे मुख्यमंत्री उद्या मुंबईवरही दावा करतील; पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका - कर्नाटकचे मुख्यमंत्री उद्या मुंबईवरही दावा करतील

कर्नाटकचे मुख्यमंत्री ( Karnataka Chief Minister Basavaraj Bommai ) हे उद्या मुंबईवरही दावा करतील, अशी खोचक टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ( Senior Congress leader ) आणि सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे सदस्य (Member of High Power Committee ) आमदार पृथ्वीराज चव्हाण ( MLA Prithviraj Chavan ) यांनी कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.

MLA Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Nov 24, 2022, 6:48 AM IST

सातारा : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka Chief Minister Basavaraj Bommai ) यांनी महाराष्ट्रतील ४० गावांवर दावा केला आहे. त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ( Senior Congress leader ) आणि सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे सदस्य ( Member of High Power Committee ) आमदार पृथ्वीराज चव्हाण ( MLA Prithviraj Chavan ) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री हे उद्या मुंबईवरही दावा करतील, अशी खोचक टीका केली आहे.

न्यायालयीन लढा ताकदीने लढू : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ही न्यायीक लढाई आहे. महाराष्ट्राने याबाबत २००४ साली सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर २०१४ मध्ये कर्नाटकने पुन्हा नवा दावा दाखल केला आहे. हे दावे-प्रतिदावे न्यायप्रविष्ट आहेत. त्यावर अंतिम निकाल झालेला नाही. सीमावादावर निर्णय घेण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे. त्यामुळे कोणी काही बोलले तरी त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या सीमा निश्चितीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारा लढा आम्ही ताकदीनिशी लढू,असे पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाण

उच्चाधिकार समिती मोदी-शहांना भेटणार : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कर्नाटक, महाराष्ट्र सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यात न्यायीक लढाई कशी लढायची, याच्यावर चर्चा झाली. सीमाभागातील लोकांवर जो अन्याय चालला आहे, त्याबाबत चर्चा झाली. याप्रश्नी पंतप्रथान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याचे ठरले आहे.

गुजरातमध्ये खरी लढत कॉंग्रेस-भाजपमध्येच : गुजरातमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये मोठी बंडखोरी आहे. आम आदमी पक्ष तेथे मोठ्या प्रमाणात निवडणुकीत उतरला असला तरी खरी लढ़त ही कॉंग्रेस आणि भाजपमध्येच आहे. भाजपची तेथे असलेली २७ वर्षांची सत्ता बदलण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कोपरापासून हात जोडले. राज्यपाल कोश्यारी हे मुद्दाम वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. त्यांना पुन्हा हिमाचलमध्ये जाऊन मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशी वादग्रस्त वक्तव्ये केल्यानंतर पक्षश्रेष्ठी परत पाठवतील, असे त्यांना वाटत असावे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा हास्यास्पद : पंधरा वर्षापूर्वी जतमधील ४०-० गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न बिकट होता. त्यानंतर हा प्रश्न पुढे आला होता. असे जुने प्रश्न उकरून काढून ती गावे कर्नाटकात येण्यास इच्छुक असल्याचा दावा सुप्रीम कोर्टासमोर करण्याचा केविलवाणा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. आपल्या कोयना धरणाचे पाणी घेऊन आपल्याच गावांवर दावा करणे हे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.