ETV Bharat / state

प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून साकारला हत्ती; पालिका कर्मचार्‍यांचे कौतुक - eco friendly project karad

कराड नगरपालिकेने गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या स्पर्धेसाठीही नगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे.

plastic karad muncipal corporation
प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून साकारला हत्ती; पालिका कर्मचार्‍यांचे कौतुक
author img

By

Published : Feb 14, 2020, 8:39 AM IST

सातारा - कराडच्या नगरपालिकेतील कर्मचार्‍यांनी कार्यालनीय कामकाज संपल्यानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळेत पाण्याच्या मोकळ्या बाटल्यांपासून हत्तीची प्रतिकृती तयार केली आहे. त्यांच्या या कारागिरीची शहरात चर्चा होत असून, त्यांचे कौतुक होत आहे.

प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून साकारला हत्ती; पालिका कर्मचार्‍यांचे कौतुक

हेही वाचा -

कोरेगाव भीमा प्रकरण: ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून महाविकासआघाडीत ठिणगी

खराब झालेले टायर आणि प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तुमुळे स्वच्छतेतही अडसर ठरतात. त्यामुळे या वस्तुंचा कलात्मक वापर करुन त्यापासून मासा, हत्ती, राजहंस यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. रंगरंगोटीमुळे या प्रतिकृती सुबक झाल्या असून शहरात विविध ठिकाणी त्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील परिसरांचे सुशोभिकरण झाले आहे. नागरीकांनीही त्याचे कौतुक केले आहे. आयलँड, कचरा डेपो, चौकांमध्ये अशा वस्तु आज दिमाखात उभ्या आहेत. गांधी जयंतीनिमित्त प्लॅस्टिकच्या कपांपासून भव्य कॅनव्हासवर महात्मा गांधींची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या आवारातील गार्डनमध्ये मोकळ्या बाटल्यांपासून तयार करण्यात आलेला राजहंस कराडकरांचे लक्ष वेधत आहे.

कराड नगरपालिकेने गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या स्पर्धेसाठीही नगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरप्रमाणे कराडला लौकीक मिळवून देण्याचा निर्धार नगरपालिका प्रशासनाने केला आहे. त्याचाच भाग म्हणून नगरपालिकेचे नगरसेवक, कर्मचारी आणि नागरीकसुध्दा स्वच्छता आणि शहराच्या सुंदरतेसाठी योगदान देत आहेत. पालिकेच्या कर्मचार्‍यांनी पाण्याच्या मोकळ्या बाटल्या स्वच्छ करून त्यापासून हत्तीची प्रतिकृती तयार केली आहे. कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर कर्मचार्‍यांनी चार दिवसांत ही प्रतिकृती साकारली आहे. त्यासाठी पाचशे ते सहाशे मोकळ्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. सध्या ही प्रतिकृती नगरपालिका आवारात उभी आहे. लवकरच ती शहरातील मोक्याच्या ठिकाणी उभी करण्यात येणार आहे.

हेही वाचा -

...म्हणून रतन टाटांचे लग्न होवू शकले नाही!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.