ETV Bharat / state

जावळीतील ग्रामपंचायतीने लग्न समारंभावर केला 50 हजार दंड ; पाच विक्रेत्यांवर गुन्हा - Five trader's booked

जावळी तालुक्यातील कुसुंबी या गावात एका लग्नसमारंभाला मर्यादेपेक्षा जास्त लोक जमा झाल्यामुळे मंगळवारी त्यांच्यावर ग्रामपंचायतीने 50 हजाराची दंडात्मक कारवाई केली.

जावळीतील ग्रामपंचायतीने लग्न समारंभावर केला 50 हजार दंड

author img

By

Published : May 5, 2021, 10:35 AM IST

सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभाच्या संख्येवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून निर्बंध घातले आहेत. तरीही जावळी तालुक्यातील कुसुंबी या गावात एका लग्नसमारंभाला मर्यादेपेक्षा जास्त लोक जमा झाल्यामुळे मंगळवारी त्यांच्यावर ग्रामपंचायतीने 50 हजाराची दंडात्मक कारवाई केली.

शंभराहून अधिक व-हाडी

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुसुंबी (ता.जावळी) येथे एका विवाहाप्रसंगी 100 पेक्षा जास्त व्यक्ती लग्नाला आले. या कारणाने ग्रामपंचायतीकडून 50 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. यापुढेही निर्बंध तोडणाऱ्यावर अशीच कारवाई होईल असे प्रशासनाने सांगितले.

साताऱ्यात फळविक्रेत्यांवर गुन्हा

कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहरातील मंगळवार तळे परिसरात फळविक्री करणाऱ्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शाहूपुरी पोलिसांना मंगळवार तळे परिसरात फळगाडे लावून काही लोक फळविक्री करत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश बाबुराव वारंगरा, हानिफ रसूल बागवान, मोबीन नासीर बागवान, महमंद इस्माईल बागवान, अकबर सलीम बागवान या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गौरी ढाणे करत आहेत.

शिवभोजन थाळी निशुल्क

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी यांचे जेवणाअभावी हाल-अपेष्टा होवू नये यासाठी शिवभोजन थाळी 15 मे पर्यंत निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.