ETV Bharat / state

कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक, तपासात निष्पन्न - satara news

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले आहेत. त्यांच्या या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. २० किलो क्षमतेच्या वजनाने ही तपासणी करण्यात आली.

Krushna factory
कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक
author img

By

Published : Jan 28, 2020, 12:07 PM IST

सातारा - कराडच्या रेठरे बुद्रुक कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाट्याची विविध निकषांनुसार सोमवारी तपासणी करण्यात आली. यामध्ये कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे आढळून आले.

हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले आहेत. त्यांच्या या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. २० किलो क्षमतेच्या वजनाने ही तपासणी करण्यात आली. यावेळी उसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजनही करण्यात आले. गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या होत्या. वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या आणि रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे दाखविण्यात येत असल्याचे यावेळी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. यामुळे कृष्णा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष आणि अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला.

हेही वाचा - माझी मेट्रो नागपूर : अ‌‌ॅक्वा लाईनच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या बाहेर गोंधळ

या पथकात कराडचे नायब तहसीलदार व्ही. आर. माने, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड-देशमुख, शेणोलीचे मंडल अधिकारी जे. बी. बोडके, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साजीद मुल्ला, विश्वास जाधव, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कोळी, लेखा परिक्षक एस. आर. फरांदे आणि वैद्य मापनशास्त्र विभागाचे निरिक्षक ल. उ. कुटे यांचा समावेश होता.

हेही वाचा - अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावर दिल्ली निवडणूक आयोगाने मागवला अहवाल..

यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, मुख्य अभियंता सुहास घोरपडे, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, वरिष्ठ अभियंता ए. डी. पाटील, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटेही उपस्थित होते.

Intro:जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार भरारी पथकाने सोमवारी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाट्याची वेगवेगळ्या निकषांनुसार तपासणी केली. त्यामध्ये कारखान्याचा वजनकाटा  अचूक असल्याचे आढळून आले.Body:
कराड (प्रतिनिधी) - जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार भरारी पथकाने सोमवारी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाट्याची वेगवेगळ्या निकषांनुसार तपासणी केली. त्यामध्ये कारखान्याचा वजनकाटा  अचूक असल्याचे आढळून आले.
    सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार कराडचे नायब तहसीलदार व्ही. आर. माने, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड-देशमुख, शेणोलीचे मंडल अधिकारी जे. बी. बोडके, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साजीद मुल्ला, विश्वास जाधव, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कोळी, लेखा परिक्षक एस. आर. फरांदे, वैद्य मापनशास्त्र विभागाचे निरिक्षक ल. उ. कुटेे यांनी सोमवारी कृष्णा कारखान्यास भेट देऊन कारखान्याच्या वजनकाट्याची संयुक्त तपासणी केली. यावेळी 20 किलो क्षमतेच्या वजनाने तपासणी करण्यात आली. तसेच उसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करण्यात आले. गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी वजन काट्यावर अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे तपासणीत आढळून आले. 
   वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे दाखविण्यात येत असल्याचेही अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. यामुळे कृष्णा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला. यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, चिफ इंजीनीअर सुहास घोरपडे, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, सिनीअर इंजीनीअर ए. डी. पाटील, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.