ETV Bharat / state

Beating a Pregnant Woman : साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेस अमानुष मारहाण; महिला आयोगाने घेतली दखल

author img

By

Published : Jan 20, 2022, 7:25 AM IST

Updated : Jan 20, 2022, 1:33 PM IST

चार महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेस पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार पळसावडे (ता. सातारा) येथे घडला. यावेळी वनरक्षक पतीसही मारहाण झाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घेतली आहे.

महिलेस अमानुष मारहाण
महिलेस अमानुष मारहाण

सातारा - प्राणी गणणेसाठी वनमजुर महिलांना घेऊन गेल्याच्या रागातून चार महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेस पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार पळसावडे (ता. सातारा) येथे घडला. यावेळी वनरक्षक पतीसही मारहाण झाली आहे. याप्रकरणी पळसावडे येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष रामचंद्र गंगाराम जानकर व त्याच्या पत्नीवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेस अमानुष मारहाण

वनरक्षक दाम्पत्य जखमी -

रामचंद्र जानकर व प्रतिभा जानकर (दोघेही रा. पळसावडे) अशी संशयितांची नावं आहेत. रामचंद्र जानकर हा माजी सरपंच आहे. सिंधू बाजीराव सानप (वय 24, रा. गोवर्धन कॉलनी दिव्यनगरी) व त्यांचे पती वनरक्षक सुर्याजी ठोंबरे यांना कर्तव्यावर असताना या दोघांनी शिविगाळ, दमदाटी करत हाताने, चप्पल, काठी व दगडाने मारहाण केली.

  • Maharashtra State Women Commission has taken cognizance of the Satara incident. The Commission has taken detailed report from SP Satara and instructed him for strict action against the accused.

    — ANI (@ANI) January 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Maharashtra State Women Commission has taken cognizance of the Satara incident. The Commission has taken detailed report from SP Satara and instructed him for strict action against the accused.

— ANI (@ANI) January 20, 2022

तुला जीवंत सोडणार नाही -

सिंधू सानप या पळसावडे तर व त्यांचे पती सुर्याजी ठोंबरे हे खडगाव बीटमध्ये वनरक्षक म्हणून सेवेत आहेत. काल (बुधवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वनरक्षक दाम्पत्य वनमजुराला घेऊन पळसावडे वनक्षेत्रात प्राणी गणणेसाठी गेले होते. त्यावेळी प्रतिभा व रामचंद्र जानकर तेथे आले. प्रतिभा जानकर हिने सुर्याजी ठोंबरे यांना चप्पलीने मारहाण सुरु केली. रामचंद्र जानकर य‍‍ांनीही शिवीगाळ करत मारहाण केली. सिंधू सानप यांना खाली पाडून हाताने, लाथाबुक्यांनी, दांडक्याने मारहाण करण्यात आली. रामचंद्र जानकर याने वनरक्षक महिलेच्या केसांना धरुन 'तुला जीवंत सोडणार नाही' असे म्हणुन त्यांचे दगडावर डोके आपटले.

आरोपीचा शोध सुरू -

वनरक्षक दाम्पत्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी जानकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची दोन पथके संशयितांच्या शोधार्थ रवाना झाली असल्याचे पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले. दरम्यान, वनरक्षक वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास भोसले यांनी वनरक्षकास झालेल्या मारहाणीचा तिव्र शब्दात निषेध केला असून संशयितांना तत्काळ अटक करुन कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने माध्यमांशी बोलताना केली.

सातारा - प्राणी गणणेसाठी वनमजुर महिलांना घेऊन गेल्याच्या रागातून चार महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेस पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार पळसावडे (ता. सातारा) येथे घडला. यावेळी वनरक्षक पतीसही मारहाण झाली आहे. याप्रकरणी पळसावडे येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष रामचंद्र गंगाराम जानकर व त्याच्या पत्नीवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साताऱ्यात गर्भवती वनरक्षक महिलेस अमानुष मारहाण

वनरक्षक दाम्पत्य जखमी -

रामचंद्र जानकर व प्रतिभा जानकर (दोघेही रा. पळसावडे) अशी संशयितांची नावं आहेत. रामचंद्र जानकर हा माजी सरपंच आहे. सिंधू बाजीराव सानप (वय 24, रा. गोवर्धन कॉलनी दिव्यनगरी) व त्यांचे पती वनरक्षक सुर्याजी ठोंबरे यांना कर्तव्यावर असताना या दोघांनी शिविगाळ, दमदाटी करत हाताने, चप्पल, काठी व दगडाने मारहाण केली.

  • Maharashtra State Women Commission has taken cognizance of the Satara incident. The Commission has taken detailed report from SP Satara and instructed him for strict action against the accused.

    — ANI (@ANI) January 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तुला जीवंत सोडणार नाही -

सिंधू सानप या पळसावडे तर व त्यांचे पती सुर्याजी ठोंबरे हे खडगाव बीटमध्ये वनरक्षक म्हणून सेवेत आहेत. काल (बुधवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वनरक्षक दाम्पत्य वनमजुराला घेऊन पळसावडे वनक्षेत्रात प्राणी गणणेसाठी गेले होते. त्यावेळी प्रतिभा व रामचंद्र जानकर तेथे आले. प्रतिभा जानकर हिने सुर्याजी ठोंबरे यांना चप्पलीने मारहाण सुरु केली. रामचंद्र जानकर य‍‍ांनीही शिवीगाळ करत मारहाण केली. सिंधू सानप यांना खाली पाडून हाताने, लाथाबुक्यांनी, दांडक्याने मारहाण करण्यात आली. रामचंद्र जानकर याने वनरक्षक महिलेच्या केसांना धरुन 'तुला जीवंत सोडणार नाही' असे म्हणुन त्यांचे दगडावर डोके आपटले.

आरोपीचा शोध सुरू -

वनरक्षक दाम्पत्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी जानकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची दोन पथके संशयितांच्या शोधार्थ रवाना झाली असल्याचे पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले. दरम्यान, वनरक्षक वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास भोसले यांनी वनरक्षकास झालेल्या मारहाणीचा तिव्र शब्दात निषेध केला असून संशयितांना तत्काळ अटक करुन कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने माध्यमांशी बोलताना केली.

Last Updated : Jan 20, 2022, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.