ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी, ठिकठिकाणी दरड कोसळून 8 जणांचा मृत्यू - Excessive rainfall in Satara district

सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातील हे काही दृष्य

author img

By

Published : Jul 23, 2021, 4:00 PM IST

Updated : Jul 23, 2021, 4:23 PM IST

सातारा - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोंढवळे येथे पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर, इतर ठिकाणी विविध घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातील हे काही दृष्य

अनेक ठिकाणी दरड कोसळली

सध्या चालू असलेल्या जारदार पावसामुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आसून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्त हानी झालेली आहे. ढोकावळे येथे 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील बाकी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मौजे मिरगाव येथेही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच, दरड कोसळल्याने त्याखाली आणखी लोक अडकल्याची शक्यता आहे.

एनडीआरएफचे एक पथक

सध्या येथे एनडीआरएफ'चे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांमार्फत युध्द पातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, कोंढवळेत दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वाई तालुक्यातील कोंढवळे येथे पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेलेली असून, सद्य:स्थितीत दोन व्यक्तींचा येथे मृत्यू झाला आहे. या ढिगाऱ्यात अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. मौजे जोर येथेही दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच, महाबळेश्वर तालुक्यामध्ये 594.04 मि. मी इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याच गावचा संपर्कही तुटला आहे.

दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता

जावली तालुक्यातील रेंगडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता आहेत. तर, दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेती पिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफचे पथक आज सायंकाळपर्यंत दाखल होणार असून, यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तात्काळ शोध व बचावकार्यास मोठी मदत होणार आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

अतिवृष्टीमुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये. नदी पात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास, तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात अथवा इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास, कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये. तसेच, अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पसरवूही नयेत असे, आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

आंबेघर गावावर डोंगराचा कडा कोसळला

पाटण तालुक्यातील आंबेघर गावावर डोंगराचा कडा कोसळला. यामध्ये १५ घरे डोंगराच्या मातीखाली दबल्याचे प्राथमिक वृत्त आहे. आज पहाटे ४ वाजता ही दुर्घटना घडली. १४ लोक मलब्याखाली अडकले असून, मुसळधार पावसामुळे मदत कार्यासाठी पोहचण्यात अडचणी येत आहेत. एनडीआरएफ'ची टीम थोड्याच वेळात दाखल होणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील मिरगाव येथे भूस्खलनाचा प्रकार घडला. त्यात बारा लोक डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भिती व्यक्त होत आहे. येथेही एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, गावातील जखमी लोकांना हेळवाक येथे बोटीच्या सहहायाने हलवले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी दिली.

Last Updated : Jul 23, 2021, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.