ETV Bharat / state

कराडला वादळी वार्‍याचा तडाखा; अनेक घरांचे नुकसान

नगरपालिकेच्या जैविक कचरा प्रकल्पाची 300 फूट उंचीची चिमणी वादळी वार्‍यामुळे जमीनदोस्त झाली. वीजेच्या खांबासह झोपडपट्टीवर चिमणी कोसळली. या घटनेत स्थानिकांच्या घरांचे सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कराडला वादळाचा तडाखा
कराडला वादळाचा तडाखा
author img

By

Published : Apr 28, 2021, 6:08 PM IST

कराड (सातारा) - रात्री उशिरा कराड परिसराला वादळी वार्‍याने तडाखा दिला. वादळी वार्‍यामुळे नगरपालिकेच्या बारा डबरे परिसरातील जैविक कचरा प्रकल्पाची चिमणी झोपडपट्टीवर पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. बर्गे वस्तीवरील एका घराचे छत उडून विजेच्या खांबावर पडले. कराड शहर आणि परिसरात वादळी वार्‍यामुळे मोठे नुकसान झाले असून लागलीच महसूल विभागाकडून पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.

रात्री साडे नऊच्या सुमारास वादळी वारामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. जाहिरातीचे बॅनर कोसळले. त्यामुळे संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडत झाला होता. नगरपालिकेच्या जैविक कचरा प्रकल्पाची 300 फूट उंचीची चिमणी वादळी वार्‍यामुळे जमीनदोस्त झाली. वीजेच्या खांबासह झोपडपट्टीवर चिमणी कोसळली. या घटनेत स्थानिकांच्या घरांचे सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चिमणी कोसळताना मोठा आवाज झाल्याने बारा डबरे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.वादळी वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केली आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचनाही महसूल कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.